
जळगाव ः ‘‘आजादी का अमृतमहोत्सव’ (Azadi Ka Amrit Mahotsav) अंतर्गत जळगाव जिल्हा ‘पाणीदार’ (Panidar Jalgaon) करण्याचा ध्यास आहे,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Abhijeet Raut) यांनी दिली. पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी व त्या परिसरातील विहिरी, कूपनलिकांची पातळी (Water Level) वाढावी, जिल्ह्यात पाणीटंचाई भासू नये, यासाठी जिल्ह्यात १०० ठिकाणी अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात ‘एक गाव-एक तलाव’ अशीही योजना राबविण्यात येत आहे,’’ असे राऊत यांनी सांगितले. यामुळे मोठ्या प्रमाणात पातळी वाढून, पाणीटंचाई मिटण्यास मदत होणार आहे.
‘जलशक्ती अभियानां’तर्गत १०० ठिकाणी अमृत सरोवर तयार करण्यासाठी तेवढ्याच ठिकाणी मार्किंग करण्यात आले आहे. १७ ठिकाणी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जलसंधारण, वन, जलसंपदा, कृषी विभाग, मनरेगा, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत या तलावांची निर्मिती होईल.
१५ ऑगस्टपर्यंत जास्तीच जास्त अमृत सरोवरांची निर्मिती केली जाईल. १५ ऑगस्टला स्थानिकांच्या हस्ते त्या ठिकाणी ध्वजवंदन करण्यात येईल. कोरोना काळात लोकसहभागातून अनेक रुग्णालयांत सुविधा देण्यात आल्या. विविध साहित्य पुरविले गेले. यामुळे अनेकांचे प्राण वाचले. लोकसहभाग चळवळीचे मोठे यश मिळाले होते. यामुळे शासकीय विभागासोबतच लोकसहभागातून अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात येत आहे.
एक गाव-एक तलाव
चाळीसगाव तालुक्यात अनेक गावांत सामाजिक संस्था, लोकसहभागातून तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. या तलावात वर्षभर पाणी असते. हाच धागा पकडत जिल्ह्यातील सर्व गावांत ‘एक गाव-एक तलाव’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
अमृत सरोवरांच्या कामांची ठिकाणे ः
चाळीसगाव तालुक्यातील अभोणे तांडा, अडगाव, मुंगी, ब्राह्मण शेवगे, एरंडोल तालुक्यात खर्ची खुर्द, एरंडोल, वरखेडी पाझर तलाव, नागदुली, विखरण गाव तलाव, जळगाव तालुक्यात कंडारी पाझर तलाव, वसंतवाडी गाव तलाव, कोढ तलाव तालखेडे ग्रामपंचायत (ता. मुक्ताईनगर), कुसुंबा बुद्रूक पाझर तलाव, गुलाबवाडी पाझर तलाव, पाल पाझर तलाव, जिन्सी पाझर तलाव (सर्व रावेर), वाकी पाझर तलाव, वरखेड बुद्रूक तलाव (बोदवड).
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.