
Jalyukta Shivar Abhiyan Washim : जल साक्षरता वाढविण्याची बाब लक्षात घेऊन गावांचा शाश्वत विकास करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान १६६ गावांत राबविण्यात येत आहे. या गावांमध्ये तीन हजार ९७७ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
त्यापैकी २०८७ कामांची अंदाजपत्रके तयार करण्यात आली असून, ३४१ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. वाशीम तालुक्यात १४१, मंगरूळपीर तालुक्यात तीन आणि रिसोडला तीन कामे पूर्णही झाली आहेत.
वाशीम तालुक्यातील अटकळी, गणेशपूर, वाघोली (बुद्रुक), पार्डी (एकबुर्जी), वांगी, अनसिंग, खडसिंग, पिंपळगाव, शेलू (खुर्द), बिटोडा (तेली), अंजनखेडा, पार्डी टकमोर, अडगाव (काटा), देवठाणा (बुद्रुक), तामसी, तामसाळा, सोनखास, तोंडगाव, झाकलवाडी, बाभूळगाव, ब्राह्मणवाडा (आसोला), फाळेगाव (थेट), जाभरुण (जहाँगीर), जांभरुण (परांडे), काकडदाती व पार्डी (आसरा) ही २६ गावे, रिसोड तालुक्यातील पंतापूर, पाटवद, केशवनगर, आसेगाव (पेन), देऊळगाव (बंडा), गोवर्धन, कोयाळी (बुद्रुक), कोयाळी (खुर्द), कोयाळी (केनवड), मांगूळ (झनक), नावली, नेतनसा, वनोजा, वरुड (तोफा), येवती, केनवड, नंधाना, मांडवा, चिचांबाभर, जवळा, कळमगव्हाण ही २१ गावे आहेत.
मालेगाव तालुक्यात ब्राह्मणवाडा (खुर्द), भामटवाडी, कळंबेश्वर, ढोरखेडा, घाटा (शिरपूर), जामठी, किन्ही (घोडमोड), कोटा, साक्रापूर, तिवडी, वसारी, गांगलवाडी, खैरखेडा, देवठाणा (खांब), खेर्डी, कोलदरा, वाकलवाडी, मुसळवाडी, शिरपूर, अमाना, डव्ही, इराळा, केळी, सुकांडा, भौरद, भिलदुर्ग, ब्राह्मणवाडा (मारसुळ) व चांडस, मंगरूळपीर तालुक्यात भूर, मजलापूर, पूर, शेंदुर्जना (मोरे), तांदळी, वनोजा, बिटोडा (भोयर), दाभाडी, दाभा, रामगड, फाळेगाव, आसेागाव, बोरव्हा (खुर्द), चिंचखेड, इचोरी, कासोळा, लावणा, पिंपळगाव, सारसी, सावरगाव, शेगी, नांदगाव व साळंबी ही २३ गावे आहेत.
मानोरा तालुक्यातील ढोणी, हिवरा (खुर्द), इंगलवाडी, रुई, शेंदुर्जना (अढाव), जवळा (खुर्द), नायगाव (बंदी), शिंगणापूर, वाईगौळ (तांडा), देरडी, घोटी, खापरी, रुद्राळा, खंडाळा, वारडा, अभयखेडा, डोंगरगाव, आमगव्हाण, बालाजीनगर, भिलडोंगर, चिखली, खापरदरी, देऊळवाडी, देवठाणा, धामणी (मानोरा), धानोरा (बुद्रुक), धानोरा (खुर्द), गिर्डा, गुंडी, हातना, हट्टी, जामदरा व जोतिबानगर अशी ३३ गावे आहेत.
आणि कारंजा तालुक्यातील भिवरी, ढंगारखेड, धनज (बुद्रुक), डोंगरगाव, हिंगणवाडी, नागलवाडी, मालेगाव, राहटी, रामटेक, शहादत्तपूर, शिरसोली, दाबापूर, सुकळी, बगी, इसाफपूर, महागाव, अनाई, बेंबळा, हसनापूर, जलालपूर, कामरगाव, खानापूर, खेर्डा (खुर्द), कुऱ्हाड, महमदापूर, म्हसला (लोधीपूर), शिवण (बुद्रुक), सुकली, टाकळी (खुर्द), विळेगाव, वडगाव, टाकळी (बुद्रुक), आंतरखेड व गिर्डा अशी एकूण ३५ गावे समाविष्ट आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.