Budget 2023 : अर्थसंकल्प अधिवेशनाकडून ‘जिगाव’ला निधीच्या अपेक्षा

येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रकल्पासाठी भरीव निधीची तरतूद होईल काय, असा प्रश्‍न उपस्थित केल्या जात आहे.
Water Project
Water ProjectAgrowon

Buldhana News : पश्‍चिम विदर्भातील एक प्रमुख प्रकल्प म्हणून जिगावची ओळख सांगितली जाते. बुलडाणा जिल्ह्यातील सहा व अकोला जिल्ह्यातील दोन तालुक्यात सुमारे २८७ गावांसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे.

पुढील वर्षात या प्रकल्पात जलसाठा (Water Stock) निर्माण करून ४५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे ध्येय ठेवण्यात आहे. वास्तवात मात्र अपुऱ्या निधीमुळे कामे जोमाने पुढे जात नाहीत.

येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget session) या प्रकल्पासाठी भरीव निधीची तरतूद होईल काय, असा प्रश्‍न उपस्थित केल्या जात आहे.

जिगाव प्रकल्पाला २०२२-२३ या वर्षात २ हजार कोटींची गरज होती. मात्र, त्यासाठी ९०० कोटी मंजूर केले गेले. या निधीसाठीसुद्धा हात आखडता घेण्यात आला. केवळ ४३० कोटी रुपयेच प्रकल्पाला मिळाले. यातून भूसंपादनाची कामे मार्गी लागली.

उर्वरित ४७० कोटी रुपये येत्या काही दिवसात प्राप्त होणार असले तरी ११०० कोटी रुपयांची उणीव आहे. लवकरच सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रकल्पाला भरीव निधीची तरतूद व्हावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्त करीत आहेत.

Water Project
Pratap Pawar : केंद्रीय अर्थसंकल्प ही राजकीय तडजोड

विदर्भातील खारपाणपट्ट्यात प्रामुख्याने अवर्षणप्रवण व शेतकरी आत्महत्याग्रस्त क्षेत्रात मोडणारा हा प्रकल्प पूर्णा नदीवर साकारत आहे. काम सुरू होऊन आतापर्यंत २५ वर्षांचा काळ लोटला आहे.

सहा हजार कोटींचा खर्च

या प्रकल्पाची अद्यावत किंमत १४५९७.३०० कोटी रुपये आहे. डिसेंबर २०२२ अखेर पर्यंत प्रकल्पाच्या कामावर ५९९१.८२२ कोटींचा खर्च झाला असून, आता प्रकल्पाची उर्वरित किंमत ९४७७.४१८ कोटी आहे.

२०१९ साली १३८७४.५९ कोटी रुपयांची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून २४ जानेवारी २०२२ ला शासनाने प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात पूर्ण करण्याच्या फेरनियोजनास मंजुरी दिली आहे.

जिगाव प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध व्हावा यासाठी आपण कायम आग्रही भूमिका घेतली आहे. त्यासाठी तरतूद पण करून आणली आहे. आगामी अधिवेशनात सुद्धा निधी मिळावा यासाठी आवाज उठवणार आहे.
आ.राजेश एकडे, मलकापूर विधानसभा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com