जुने जाऊ द्या मरणालागुनी

जसजसा आधुनिक काळ येत आहे, तसतसा बदलाचा वेगही वाढत आहे. जिथे मोठमोठे रस्ते, उंच इमारती उभ्या राहिलेल्या दिसतात, त्याठिकाणी काही काळापूर्वी दुर्गम खेडेगाव होते.
मशागत लेख
मशागत लेखAgrowon

शंकर बहिरट

जसजसा आधुनिक काळ येत आहे, तसतसा बदलाचा वेगही वाढत आहे. जिथे मोठमोठे रस्ते, उंच इमारती उभ्या राहिलेल्या दिसतात, त्याठिकाणी काही काळापूर्वी दुर्गम खेडेगाव होते. हे तिथे येणाऱ्या नवीन माणसाला खरे वाटत नाही. वर्षानुवर्षे झोपडीत राहणारा माणूस दरवर्षी पावसाळ्याआधी ती झोपडी शेकारून घेत असे. दुरुस्त करून पुन्हा वापरत असे. आधुनिक काळात माणूस पक्क्या घरात राहू लागला. कामाच्या सोयीनुसार आणि आर्थिक ऐपतीप्रमाणे जुनाट आणि सोयीची नसणारी घरे पाडू लागला आणि त्या ठिकाणी वेगवेगळी अद्ययावत घरे बांधू लागला. तंत्रज्ञानातही इतके झपाट्याने बदल होत आहेत की रोज नवनवीन अपडेट येत आहेत. कालपर्यंत वापरात असलेल्या वस्तूला आज नवा पर्याय उपलब्ध असतो. रोजच्या वापरातील नवे प्रगत मॉडेल आले की ते आपल्याकडे असावे असे प्रत्येकाला वाटू लागले आहे.

आधुनिकीकरणाचा वेग इतका आहे की काल आलेले तंत्रज्ञान आज जुने झालेले असते. सहज आठवून बघा लहानपणी आपल्या वापरात असलेल्या कितीतरी वस्तू आता कालबाह्य झाल्या आहेत. ज्याप्रमाणे विज्ञान तंत्रज्ञान विकसित होत आहे, त्याच्या जोडीला आपले विचार विकसित होत आहेत का? हे तपासून बघायला हवे. कालानुरूप शिक्षणही आधुनिक झाले आहे. मात्र, त्या शिक्षणाचा उपयोग फक्त मेरीट मिळवून रोजीरोटी कमवण्यासाठी नसून आपले विचार जास्तीत जास्त विकसित कसे होतील, यासाठी करायला हवा.

आपली संस्कृती, उज्ज्वल परंपरा आणि आधुनिक काळ यांची सांगड घालणारा विकसित विचार रुजवायला हवा. संस्कृतीच्या नावाखाली अनेक जुन्या चालीरीती, अंधश्रद्धा, प्रगतीला बाधा आणणाऱ्या अनेक जुनाट परंपरा, नव्या आधुनिक युगात आपण फेकून द्यायला हव्यात.

पद्धतीने केल्या जाणाऱ्या कामाला फाटा देऊन ज्याप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाचा आपण वापर करू लागलो त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीचा विचार करताना आपण विज्ञान युगात वावरत आहोत याचे भान ठेवून तशीच आपली कृती असायला हवी. चमत्कारामागच्या विज्ञानाचा शोध घेतला तर अंधश्रद्धा संपुष्टात येते. सध्याचा आधुनिक काळ असूनही रोजच्या आयुष्यात अशा अनेक चालीरीती, रूढी, परंपरांना आपण कवटाळून बसलेलो असतो. अनेक जुन्या मान्यता, जुनाट बुरसटलेले विचार आजच डोक्यातून काढून फेकून द्यायला हवेत आणि मेंदूत नव्या सुधारित विचारांची पेरणी करायला हवी.

केशवसुत म्हणतात..

जुने जाऊ द्या मरणालागुनी

जाळुनी किंवा पुरुनी टाका

सडत न एक्या ठायी ठाका

सावध! ऐका पुढल्या हाका.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com