Kailas Patil Protest: अखेर सातव्या दिवशी कैलास पाटील यांचे उपोषण मागे

अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची भरपाई पात्र शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे (Shivsena) आ. कैलास पाटील (Kailas Patil) यांनी उपोषण केले होते. अखेर सातव्या दिवशी (ता.३०) त्यांनी उपोषण मागे घेतले आहे.
Kailas Patil Protest
Kailas Patil ProtestAgrowon

अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची भरपाई पात्र शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे (Shivsena) आ. कैलास पाटील (Kailas Patil) यांनी उपोषण केले होते. अखेर सातव्या दिवशी (ता.३०) त्यांनी उपोषण मागे घेतले आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याचा निर्णय कैलास पाटील यांनी घेतला.

Kailas Patil Protest
Kailas Patil : पाचव्या दिवशीही आमदार कैलास पाटील यांचे उपोषण सुरुच

रविवार (ता.३०) आंदोलनाच्या सातव्या दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांनी उपोषणाला भेट दिली. त्यावेळी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे हजर होते. कैलास पाटील यांनी नारळ पाणी घेऊन उपोषण मागे घेतले.

राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कैलास पाटील यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा करण्यासंदर्भात बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

जोवर पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाहीत तोवर उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका आ. पाटील यांनी घेतली होती. मात्र शासन आणि प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर आ. पाटील यांनी उपोषण मागे घेतले. आ. पाटील यांच्या उपोषणाची शासन आणि प्रशासनाकडून दखल घेण्यात आली होती.

शासन आणि प्रशासन दोन्ही स्तरावरून हालचाली सुरू होत्या. मात्र प्रकृती बिघडल्यामुळे आ. पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, असा सल्ला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे पाटील यांनी सांगितले.

उपोषणाच्या सहाव्या दिवशी पाटील यांची प्रकृती बिघडली होती. मात्र तरीही मागणी पूर्ण झाल्याशिवाय माघार घेणार नाही असे सांगितले होते. मात्र रविवारी (ता.३०) सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीची शासकीय मदत त्वरित देण्याचे आश्वासन दिले. तसेच विमा भरपाई वसुलीसाठी कंपनीचे बँक खाते गोठवणे आणि प्रॉपर्टी जप्त करणे अशा स्वरूपाची कार्यवाही सुरू केली जाईल, असेही आश्वासन दिल्याने कैलास पाटील यांनी उपोषण मागे घेतले.

दरम्यान राज्य सरकारने आश्वासन पूर्ण केले नाही तर पुन्हा लढा देऊ असाही इशारा आ. कैलास पाटील यांनी दिला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com