Rice : कामडी यांच्या ‘अश्विनी’ची राष्ट्रीय पातळीवर नोंद

राष्ट्रीय पातळीवर नोंदणी केल्यामुळे सुनील कामडी यांना ‘अश्विनी‘ जातीचे बीजोत्पादन, बियाणे विक्री तसेच निर्यातीसाठी १५ वर्षांचा स्वामित्व हक्क मिळाला आहे.
Paddy
PaddyAgrowon

पुणे ः डेंगाचीमेट (कामडीपाडा) (ता. जव्हार, जि. पालघर) येथील प्रयोगशील आदिवासी शेतकरी (Tribal Farmer) सुनील कामडी (Sunil Kamadi) यांनी विकसित केलेल्या ‘अश्विनी‘ या भात जातीची (Ashwini Paddy Verity) नुकतीच राष्ट्रीय पातळीवर पीक जाती रजिस्टरमध्ये (Crop Verity Register) नोंद घेण्यात आली. या बाबतचे प्रमाणपत्र देखील त्यांना मिळाले आहे. कामडी यांनी ही भात जात (Paddy Verity) निवड पद्धतीने विकसित केली आहे.

Paddy
Paddy : भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापन

राष्ट्रीय पातळीवर नोंदणी केल्यामुळे सुनील कामडी यांना ‘अश्विनी‘ जातीचे बीजोत्पादन, बियाणे विक्री तसेच निर्यातीसाठी १५ वर्षांचा स्वामित्व हक्क मिळाला आहे.

Paddy
Paddy Cultivation: भाताने वाढवली चिंता

सुनील कामडी हे २००८ पासून बाएफ संस्थेच्या कृषी जैवविविधता संवर्धन प्रकल्पाशी जोडले गेले आहेत. भात जातीच्या विकासासाठी तांत्रिक मार्गदर्शन तसेच राष्ट्रीय पातळीवरील नोंदणीसाठी कामडी यांना बाएफ संस्थेतील तज्ज्ञांची मोठी मदत झाली आहे. २०११-१२ मध्ये सुनील कामडी यांना राष्ट्रीय पातळीवर पीक जाती संरक्षण आणि शेतकरी अधिकार हक्क यंत्रणेमार्फत ‘पारंपरिक जाती संवर्धन पुरस्कार’ आणि २०१७ मध्ये राज्य शासनातर्फे ‘वसंतराव नाईक कृषी पुरस्कारा’ने गौरविण्यात आले आहे. तसेच बाएफ संस्थेने प्रयोगशील शेतकरी या पुरस्काराने कामडी यांना सन्मानित केले आहे.

‘अश्विनी’ वैशिष्टे...

- विविध विभागांत लागवडीस योग्य

- ११५ ते १२० दिवसांचा कालावधी

- पाण्याचा ताण सहन करणारी ही जात

- खोड किडा आणि पर्ण करपा रोगास प्रतिकारक

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com