Kardai Cultivation : केव्हीकेच्या पुढाकाराने मांगूळ येथे करडई शेतीदिन

करडई व कांदा पिकासारख्या अधिकाधिक फुलावस्था राहणाऱ्या पिकात परागीकरण होण्याच्या दृष्टीने मित्र किट मधमाशीचे महत्त्व देखील व्यक्त केले.
Kardai Cultivation
Kardai CultivationAgrowon

Washim News : कृषी विज्ञान केंद्राद्वारे (Agricultural Science Center) भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) नवी दिल्ली - कृषी प्रौद्योगिकी अनुप्रयोग संशोधन संस्था पुणे यांच्या सौजन्याने रब्बी हंगामामध्ये करडई पीक (Kardai Crop) शेतीदिनाचे मांगूळ झनक येथे बुधवारी (ता.२२) आयोजन करण्यात आले. दत्तराव झनक यांच्या शेतात हा कार्यक्रम झाला.

अध्यक्षस्थानी केव्हीकेचे कृषी विस्तारतज्ज्ञ डॉ. एस. के .देशमुख होते. कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य भूषण दांदळे, माजी उपसभापती महादेवराव ठाकरे, मांगूळ झनक येथील ग्रामपंचायत सदस्य अभिमन्यू गोटे दत्तराव झनक, केशवराव बाजड, कृषी विद्याविद्याशास्त्र तज्ज्ञ तुषार देशमुख , कृषी सहायक आय. एम. कचकलवार उपस्थित होते.

Kardai Cultivation
Safflower Harvesting : गहू ओंबी भरण्याच्या, तर करडई काढणीच्या अवस्थेत

टी. एस. देशमुख यांनी प्रास्ताविकात करडई पीक सुधारित वाण आयएसएफ ७६४ ची वैशिष्ट्ये सांगितली. पीक नियोजनात शेतीदिनाचे महत्त्व स्पष्ट केले.

करडई व कांदा पिकासारख्या अधिकाधिक फुलावस्था राहणाऱ्या पिकात परागीकरण होण्याच्या दृष्टीने मित्र किट मधमाशीचे महत्त्व देखील व्यक्त केले.

वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आरोग्यपूर्ण आहारासाठी तसेच बदलत्या वातावरणात कमी पाण्याची गरज असलेल्या पिकांची लागवड करण्याचा सल्ला दिला.

श्री. कचकलवार यांनी कमी उत्पादन घेणाऱ्या हरभरा उत्पादकांना नफा समजून घेण्याची गरज असल्याचे सांगत हरभऱ्यामधील करडईच्या आंतरपीक पद्धतीतून तेलबिया उत्पादन आणि आरोग्यदायी तेल प्रक्रियेच्या संधी शोधण्याची गरज मांडली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com