खानदेशी भरीत वांग्याचा उल्लेख महाभारतातही

वांगं म्हणजे शाकाहारी लोकांचं मटण. या लोकांच्या रक्तातच वांगी वाहतात म्हणा ना. दर दोन दिवसाला जेवणात वांगं असतंच असतं. ओला कांदा, भाकरी, मिरचीचा ठेचा, दही आणि मस्त रसरशीत भरलेली वांगी असेल तर माणूस मटणाला पण नाही म्हणेल.
Khandeshi Brinjal
Khandeshi BrinjalAgrowon

वांगं (Brinjal) म्हणजे शाकाहारी लोकांचं मटण (Mutton). या लोकांच्या रक्तातच वांगी वाहतात म्हणा ना. दर दोन दिवसाला जेवणात वांगं असतंच असतं. ओला कांदा, भाकरी, मिरचीचा ठेचा, दही आणि मस्त रसरशीत भरलेली वांगी असेल तर माणूस मटणाला पण नाही म्हणेल. पण याही पेक्षा वांग्याची फेमस रेसिपी कोणती असेल तर खानदेशी वांग्याचं (Khandeshi Brinjal) भरीत.

तर वांग्याचा इतिहास बघायला गेलं ना तर महाभारत आणि बऱ्याच मोठ्या प्राचीन ग्रंथांमध्ये वांग्याचा उल्लेख सापडेल. नुसता उल्लेख नाही तर रेसिपीपण सापडते.

Khandeshi Brinjal
बीटी वांगे लागवडीसाठी किसान सत्याग्रह

म्हणजे सांगायचं झालं तर खानदेशी भरताच्या वांग्यांचा उल्लेख महाभारतातही आढळतो. महाभारतात पांडवांनी द्रौपदीला पणाला लावलं तेव्हा श्रीकृष्णाने वस्त्र पुरवून तिची अब्रू वाचवली. याचं ऋण फेडावं म्हणून द्रौपदीने कृष्णाला खांडवनाचा काही भाग दान म्हणून दिला. या दानासोबत तिनं जेवणाचं ताटही श्रीकृष्णाला दिलं. दिलेलं दान इतरांना दिलं की ते वाढतं म्हणून कृष्णानं ते दान आपल्या अहिर गवळींना दिलं. कृष्णानं दान दिलेला देश म्हणजेच कान्हदेश. या कान्हदेशाचा अपभ्रंश झाला खानदेश. द्रौपदीने दिलेल्या जेवणाच्या ताटात एक वातनाशक पदार्थ होता, तो म्हणजे वांगं.

Khandeshi Brinjal
नगरला वांगी, शेवगा, गवारीचे दर टिकून

दुसरा संदर्भ म्हणजे स्वामीनारायण यांनी स्थलांतर करताना आपल्या प्रत्येक अनुयायाला भुक भागवण्यासाठी एकेक फळ दिलं होतं. ही फळभाजी फक्त थंडीच्याच काळात येते. कडाक्याच्या थंडीत अंगात ऊब राहावी यासाठी ही भाजी महत्त्वाची असते. दगडांच्या चुलीवर ही फळभाजी भाजता येते. थोडक्यात हे होतं भरीत वांगं.

अशा प्रकारे भरीत वांग्याला ऐतिहासिक संदर्भ आहे.

मराठवाड्यात जशा हुरडा पार्ट्या रंगतात तशा जळगावात भरीत पुरी, भरीत भाकरीच्या पार्ट्या रंगतात. हिरवी पांढरी वांगी तूर काट्या, पऱ्हाटीवर भाजून लाकडी ठेचण्याने बडगीत एकसंध केली जातात. यात लसूण मिरचीचा ठेचा, कांद्याची हिरवीगार ताजी पात टाकतात. थोडे शेंगदाणे घालून हळद जिऱ्याची फोडणी घातली की तळलेल्या गव्हाच्या पुऱ्यासोबत पार्टीचा बेत जमतो.

आता खानदेशी भरताच्या वांग्यात इतकं विशेष काय म्हणाल तर ही वांगी हिरव्या पांढऱ्या रंगाची असतात. तब्बल दीडशे ते अडीचशे ग्रॅम वजनाची वांगी असतात. या अप्रतिम चवीची वांगी फक्त जळगावच्या मातीतच पिकतात. त्यात बिया जास्त नसतात. ही वांगी खायला रुचकर, गोड, मऊ असतात. इतरही भागात भरताचं वांग होतं पण जळगावच्या वांग्याची आणि भरताची सर त्यांना येत नाही. खानदेशातल्या लेवा पाटील मंडळींनी भरीत भाकरी यांची एक संस्कृती जपली आणि ती वाढवली सुद्धा.

थंडीच्या दिवसात राजकीय मंडळींचे खानदेश दौरे असले की हमखास भरीत भाकरीचं जेवण असतं. या जेवणाची चर्चा लागलीच दुसऱ्या दिवशी प्रसार माध्यमांमध्ये रंगते. एकट्या जळगाव जिल्ह्यात दरवर्षी किमान तीनशे ते साडेतीनशे हेक्टर क्षेत्रावर भरीत वांग्यांची लागवड केली जाते. खानदेशी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतल्यामुळे भरीत वांगी पिकासाठी जीआय टॅग मिळालाय. या मानांकनामुळे भरीत वांग्याची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com