Chilli Cultivation : किल्ले धारूर तालुका बनतोय मिरचीचे हब

किल्ल्ले धारूर तालुक्यात मागील दोन वर्षांपासून मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे.
Chilli Cultivation
Chilli CultivationAgrowon

किल्ल्ले धारूर : तालुक्यात मागील दोन वर्षांपासून मिरचीची लागवड (Chilli Cultivation) मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात पाण्याची उपलब्धता अत्यल्प प्रमाणात आहे. मात्र याच कमीअधिक पाण्यामध्ये येथील शेतकरी आधुनिकतेची कास धरत तंत्रज्ञानाचा वापर करून ठिबक सिंचनाद्वारे मोठ्या प्रमाणात मिरची लागवड करत आहेत.

येथील मिरचीला इतर मिरचीच्या तुलनेत बाजारपेठेत मोठी मागणी असून भावसुद्धा जास्तीचा मिळत असल्याने शेतकरी यातून उत्पन्न मिळवत आहेत. यामुळे यावर्षी तालुक्यात दोनशे एकरच्या जवळपास सिमला व हिरवी मिरची लागवड झाली आहे.

मागील काही वर्षापासून बदलत्या वातावरणामुळे कधी अतिवृष्टी, गारपीट तर कधी दुष्काळ यामुळे शेतकरी पुरता होरपळून निघत आहे.

Chilli Cultivation
Bhiwapuri Chilli : विदर्भात भिवापुरी मिरचीचे अस्तित्व धोक्‍यात

शेतीवर केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी कर्जबााजारी होत असून आत्महत्याचेही प्रमाण वाढले आहे. मात्र आता हे चित्र बदलत आहे. तालुक्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेती करत आहेत.

काही वर्षांपासून सिमला मिरची व हिरवी मिरचीचे क्षेत्र वाढले असून एकरात सिमला मिरची किंवा हिरवी मिरचीतून शेतकरी सरासरी दोन तीन लाख रुपये मिळवत आहेत. यामुळे तालुका मिरची हब म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

तालुक्यात मागील दोन-तीन वर्षांपासून मिरचीचे क्षेत्र वाढत आहे. सिमला किंवा हरवी मिरचीतून शेतकरी एक एककरातून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. अशीच प्रेरणा घेऊन इतर शेतकरीदेखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मिरची लागवड करत आहेत.
लक्ष्मण गायकवाड, कृषी सहायक धारूर
साधारणतः एक एकरात पंधरा हजार सिमला मिरचीची झाडे लागवड केली जातात. यातून या संपूर्ण हंगामात तीस टनांपर्यंत उत्पादन मिळते. सरासरी वीस रुपये भाव मिळाला तरी सहा लाख रुपये उत्पन्न मिळते. यातून दोन अडीच लाख रुपये खर्च जरी झाला तरी तीन साडेतीन लाख रुपये अलगत मिळत मात्र या पिकांना योग्य नियोजन करावे लागते.
श्रीनिवास शिनगारे, शेतकरी
पारंपरिक शेतीला फाटा देत आम्ही गेल्या तीन वर्षांपासून मिरची या पिकाची लागवड करत आहोत. यामुळे आम्हाला या पिकातून चांगले उत्पन्न मिळत आहे आणि आमच्या मिरचीला इतर तालुक्यांपेक्षा दोन ते तीन रुपये भाव जास्त मिळत आहे. वाहतूक आणि अडतीचा खर्च नसल्यामुळे आमचा माल व्यापारी जागेवर खरेदी करत आहेत.
संभाजी जाधव, शेतकरी, ढगेवाडी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com