चिखली बाजारात सोयाबीन आवक स्थिर

राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला आज किती भाव मिळाले हे जाणून घेऊ.
चिखली बाजारात सोयाबीन आवक स्थिर

नागपूर बाजारात सोयाबीनची आज 7 जून रोजी 386 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला आज किमान 5500 रुपये तर कमाल 6450 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6213 रुपयांवर होता.चिखली बाजारात सोयाबीनची (soybean)688 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 5800 रुपये होता. तर कमाल भाव 6900 रुपयांचा मिळालाय. या मालाला सर्वसाधारण 6350 चा भाव मिळालाय.वाशीम बाजारात सोयाबीनला किमान 6000 रुपये दर मिळाला. तर कमाल व्यवहार 7200 रुपयाने झाले. सरासरी दर 6500 रुपये मिळाला.

मराठवाड्यातील महत्त्वाच्या सोयाबीन बाजारांपैकी एक असलेल्या हिंगोली बाजारामध्ये आज 7 जून रोजी 500 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणलं गेलं. या मालाचे भाव किमान 5990 रुपये ते कमाल 6500 रुपयांच्या दरम्यान राहिले. तसेच आवक मालाचे सर्वात जास्त व्यवहार 6245 रुपयांनी झालेत. हिंगोली बाजारात आज सोयाबीनची आवक घटली होती.तिकडे पैठण बाजारात 4 क्विंटलवर आवक झाली. या आवक मालाला किमान 5880 तर कमाल 5880 रुपयांचा दर(rate) मिळाला. इथं सर्वसाधारण दर 5880 रुपयांचा राहिलाय.दुसरीकडे तुळजापूर बाजारात किमान 6000रुपये तर कमाल 6451 रुपयांचा दर होता. तर सर्वसाधारण दर 6300 होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com