Livestock : कोकण पशुसंवर्धन सल्ला

वाऱ्याचा वेगही ३०-४० कि.मी. प्रति तास इतका राहू शकतो. त्यामुळे गाई, म्हशी इ. जनावरे झाडाखाली न बांधता सुरक्षित ठिकाणी पाण्याच्या ठिकाणापासून दूर बांधावीत.
Animal care
Animal careAgrowon

पशुसंवर्धन ः - हवामान विषयक अंदाजानुसार (Weather Forecast) कोकणामध्ये विशेषतः रायगड जिल्ह्यामध्ये दोन, तीन दिवस (२ ऑक्टोबरपर्यंत) कोकणातील (Konkan Area) तुरळक ठिकाणी विजेचा कडकडाट (Thunderstorm) आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता (Rain Forecast) वर्तविण्यात आलेली आहे.

Animal care
Kokan Rivers : कोकणातील नद्यांची नैसर्गिक रचनाच बदलली

तसेच वाऱ्याचा वेगही ३०-४० कि.मी. प्रति तास इतका राहू शकतो. त्यामुळे गाई, म्हशी इ. जनावरे झाडाखाली न बांधता सुरक्षित ठिकाणी पाण्याच्या ठिकाणापासून दूर बांधावीत.

-गोठ्यामधील जनावरांना माशी, डास, गोचीड व पिसवांचा उपद्रव होऊ नये, यासाठी गोठ्यांचे निर्जंतुकीकरण करावे. जनावरांचे गोचिडांपासून संरक्षणाकरिता गोठ्याची स्वच्छता राखावी. ब्युटोक्स या रसायनाची २ मि.लि. प्रति लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून जनावरांच्या अंगावर आणि गोठ्यामध्ये व सभोवती फवारणी करावी.

Animal care
Kokan and Ghat Matha वर पावसाचा Red Alert कायम|Weather Update|Agrowon

- लम्पी स्कीन या रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने गाईंचे लसीकरण करून घ्यावे.

- फुलोऱ्यावर असलेल्या हिरवा चाऱ्याची मुरघास पद्धतीने साठवण करावी. यासाठी प्रत्येकी १०० किलो बारीक तुकडे केलेल्या गवतावर ५ ते ६ लिटर पाण्यामध्ये तयार केलेले द्रावण (२ किलो गूळ + अर्धा किलो युरिया + १ किलो मीठ) शिंपडावे. प्रक्रिया

Animal care
Vidrbha and Kokan मधील तुरळक ठिकाणी Heavy Rain चा इशारा| Agrowon

केलेल्या गवताचे थर रचून साठवून ठेवावेत. त्यासाठी प्लॅस्टिक सायलो बाजारात सहज उपलब्ध असून, ते पूर्ण भरावेत. पाऊस आणि उष्णतेपासून संरक्षणासाठी हे सायलो शेडमध्ये ठेवावेत. अशा पद्धतीने २ ते ३ महिन्यांमध्ये मुरघास जनावरांना खाण्यासाठी तयार होतो.

Animal care
South Kokan मध्ये आज Heavy Rainfall चा अंदाज|weather update|Agrowon | ॲग्रोवन

शेळी पालन ः

शेळ्यांमध्ये जंताचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असते. जंताच्या प्रादुर्भावामुळे जनावरांना पातळ संडास होणे, खाणे कमी होणे आणि वजन घटणे अशी लक्षणे दिसून येतात.

जंताचा प्रादुर्भाव झाल्यास, नियंत्रणासाठी फेबेंडाझॉल ५ मिलिग्रॅम किंवा अलबेंडाझॉल ७.५ मिलिग्रॅम प्रति किलो वजनाप्रमाणे शेळ्यांना औषध द्यावे.

Animal care
Monsoon Rain ची Kokan, Marathwada भागात शक्यता |Monsoon Update|Agrowon

कुक्कुटपालन ः

पक्ष्यांना रानीखेत रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे.

मत्स्यसंवर्धन ः

- तलाव किंवा शेततळ्यामध्ये मत्स्यसंवर्धन करण्याकरिता मत्स्यबीज उपलब्धता करून घ्यावी. असे बीज तलाव/शेततळ्यामध्ये सोडावे. तलाव/ शेततळ्यामध्ये मत्स्यसंवर्धनाकरिता कटला, रोहू, मृगळ, कॉमन कार्प, सिल्वर कार्प, पंगँसियस, तिलापिया, जिताडा, जम्बो कोळंबी

या पैकी योग्य त्या माशांची निवड करावी.

-ढगाळ वातावरणामध्ये पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते. अशा वेळी मासळी जगणुकीचे प्रमाण कमी होते. यासाठी पाण्यातील प्राणवायू आणि सामू इ. बाबींची तपासणी करणे आवश्यक असते.

- गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन आणि मत्स्य बीज व सामग्री पुरवठादार विषयक विस्तृत माहिती एकत्रित मिळण्याकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेले efishMBRSDBSKKV हे ॲप वापरता येईल. हे ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करावे.

संपर्क ः (०२३५८) २८२३८७/ ८१४९४६७४०१

(ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com