Sugar Factory : ‘कुंभी’ कारखान्यावर सत्ताधाऱ्यांचेच वर्चस्व

मतमोजणीत विरोधी राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलने आमदार पी. एन. पाटील यांच्या मदतीने करवीर तालुक्यासह एकूण ३५ गावांमध्ये पहिल्या फेरीत सरासरी ३५० ते ४०० मतांची आघाडी घेतली होती.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon

Kolhapur News : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत (Election of Kumbi-Kasari Cooperative Sugar Factory) माजी आमदार चंद्रदीप नरके (MLA Chandradeep Narake) यांच्या सत्ताधारी पॅनेलने पुन्हा वर्चस्व राखले. पॅनलचे सर्व २३ उमेदवार विजयी झाले.

मतमोजणीत विरोधी राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलने आमदार पी. एन. पाटील यांच्या मदतीने करवीर तालुक्यासह एकूण ३५ गावांमध्ये पहिल्या फेरीत सरासरी ३५० ते ४०० मतांची आघाडी घेतली होती.

मात्र, दुसऱ्या फेरीत आमदार विनय कोरे आणि ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके यांच्या पुढाकारामुळे विरोधकांना पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांत अशाच पद्धतीने आघाडी मिळविता येईल, हा विराधेकांचा अंदाज खोडून काढत सत्तारूढ चंद्रदीप नरके यांच्या पॅनेलने तब्बल ४५० ते ६०० मतांची आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरू केली.

Sugar Factory
Cooperative Election : आदिवासी कारखाना निवडणूक २० डिसेंबरपर्यंत स्थगित

‘कुंभी’ कारखान्यासाठी रविवारी (ता. १२) चुरशीने ८२.४५ टक्के मतदान झाले. रमण मळा येथील शासकीय बहुद्देशीय हॉलमध्ये बुधवारी (ता. १५) सकाळी आठपासून ३५ क्रमांकाच्या टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली.

एकूण तीन फेरीत मतमोजणी झाली. सकाळी आठ ते सायंकाळी पाच अशी एकूण तब्बल नऊ तास मतमोजणी सुरू राहिली.

पहिल्या फेरीत सात हजार मते मोजण्यात आली. त्यात विरोधी राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलचे १८ उमेदवार, तर सत्ताधारी नरके पॅनेलचे पाच उमेदवार आघाडीवर होते. पहिल्या फेरीत करवीर तालुक्यातील १८ गावांतील ३५ केंद्रांची मतमोजणी झाली.

या गावातून विरोधी पॅनेलला ३५० ते ५०० च्या फरकाने आघाडी मिळाली. दुसऱ्या फेरीदरम्यान सत्ताधारी नरके गटाने विरोधी पॅनेलचे मताधिक्य तोडून आघाडी घेण्यास सुरुवात केली. ती शेवटपर्यंत कायम ठेवली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com