Employment Guarantee Scheme : मजूरांना 'रोजगार हमी योजने'चा मिळतोय आधार

रोजगारानिमित्त होणारे मजुरांचे स्थलांतर रोखून गाव व परिसरात रोजगार हमी योजनेतून मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात करण्यात येत आहे.
Employment Guarantee Scheme
Employment Guarantee Scheme Agrowon

Washim News : रोजगारानिमित्त होणारे मजुरांचे स्थलांतर रोखून गाव व परिसरात रोजगार हमी योजनेतून मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (Employment Guarantee Scheme) माध्यमातून जिल्ह्यात करण्यात येत आहे.

जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विविध ९७३ कामांवर चार हजार ६२२ मजूर काम करीत आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण मजुरांचे कामानिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने गाव पातळीवर नियोजन केले आहे.

सन २०२२-२३ या वर्षात जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये १९५२ कामे तर सन २०२१-२२ या वर्षात ३६२४ कामे अशी एकूण ५५७६ कामे सेल्फवर ठेवण्यात आली होती.

Employment Guarantee Scheme
Employment Guarantee Scheme : ‘रोजगार हमी योजनेत सर्व पिकांचा समावेश करावा’

कामे सेल्फवर ठेवण्यामागील उद्देश ग्रामपंचायतस्तरावर मजुरांनी कामाची मागणी करताच त्यांना कामे उपलब्ध करून देणे हा आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सक्रिय मजुरांची संख्या ७८ हजार २०४ इतकी आहे.

जिल्ह्यातील सक्रिय मजुरांना या पुढील काळात जास्तीत जास्त मजुरी मिळावी व त्यामाध्यमातून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी तसेच मजुरांचे कामानिमित्त होणारे स्थलांतर थांबविण्याच्या दृष्टिने जिल्ह्यातील गटविकास अधिकारी व तालुकास्तरीय नरेगा यंत्रणेला नरेगाअंतर्गत मोठया प्रमाणात कामे सुरू करून मजुरांना मजुरी वेळेवर देण्याबाबत निर्देश दिले आहेत.

त्यानुसार जिल्ह्यात नरेगाअंतर्गत जास्तीत जास्त कामे सुरू होऊन सक्रिय मजुरांना मजुरी मिळेल तसेच मजूर उपस्थितीमध्ये देखील लक्षणीय वाढ होण्यास मदत होईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com