
Navi Mumbai News : सिडकोच्या ‘नैना’विरोधात पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांनी उभारलेली वज्रमूठ अलिबाग-वसई-विरार कॉरिडॉरला (Alibuag Vasai Corridor) महागात पडण्याची चिन्हे आहेत.
कारण नैनामुळे होणाऱ्या विकासाचे गाजर दाखवून जमीन संपादन (Land Acquisition) करणाऱ्या सिडको प्रशासनाच्या (CIDCO Administration) आलेल्या अनुभवामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप असून अलिबाग-वसई-विरार कॉरिडॉरसाठी जमीन संपादन करताना रेडीरेकनरच्या चालू भावापेक्षा थेट पाचपट जादा दर शेतकऱ्यांनी मागितला.
नैनाविरोधातील गावागावांतून व्यक्त होणाऱ्या संतापामुळे अलिबाग-वसई-विरार कॉरिडॉरच्या भूसंपादनालाही फटका बसण्याची चिन्हे आहेत.
एमएसआरडीसीतर्फे उभारण्यात येणाऱ्या अलिबाग-वसई-विरार कॉरिडॉरसाठी पनवेल तालुक्यातील तब्बल ४२ गावे बाधित होत आहेत. या गावांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत भूसंपादनाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
सध्या जमीन संपादनासाठी महसूल विभागाकडून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. गावपातळीवर ग्रामस्थांना सरकारकडून मिळणारा मोबदला पटवून सांगण्यासाठी बैठका सुरू आहेत.
बोर्ले गावातील बैठकीत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना जमिनीसाठी मिळणाऱ्या मोबदल्याची माहिती दिली. यामध्ये सरकारने जमिनींसाठी रेडीरेकनरच्या चालू भावाच्या अडीचपट मोबदला मिळेल, असे आश्वासन दिले.
तसेच ज्या जमिनी नैनामध्ये आहेत, अशा जमिनींसाठी सरकारकडून मिळणारा मोबदला गुंठ्याला दहा ते १२ लाखांपर्यंत जाऊ शकतो, असे आश्वासन ‘महसूल’कडून मिळत आहे. शेतकऱ्यांकडून रेडीरेकनरच्या चालू भावापेक्षा पाचपट मोबदला मागणी केली जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.