NDCC Bank Update : नाशिक जिल्हा बँकेकडून सुरू जमीनजप्ती, सक्तीची वसुली थांबविणार

नाशिक जिल्हा बँकेकडून जमीन जप्तीची कारवाई थांबविण्यासोबतच सक्तीची वसुली होणार नाही.
District Bank
District BankAgrowon

Nashik News : नाशिक जिल्हा बँकेकडून (Nashik District Bank) जमीन जप्तीची कारवाई थांबविण्यासोबतच सक्तीची वसुली होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी निफाड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसलेल्या शेतकरी संघर्ष संघटना, शेतकरी संघटना समन्वय समिती व नाशिक जिल्हा समन्वय समितीच्या शिष्टमंडळाला दिले.

मुंबईत सह्याद्री अतिथी गृहावर गुरुवारी (ता. २०) सायंकाळी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मध्यस्थीने ही चर्चा पार पडली.

आमदार राजू पाटील, अमित ठाकरे, माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी उपस्थित होते. सध्याची परिस्थिती लक्षात घेता अल्प कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी तगादा लावू नये, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

District Bank
NDCC Bank : नाशिक जिल्हा बॅंकेची वसुली यंदा घटणार

या शिष्टमंडळात शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, शेतकरी संघटना समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष भगवान बोराडे, नाशिक जिल्हा शेतकरी समन्वय समितीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तुषार गांगुर्डे, दत्तात्रय सुडके, दिलीप पाटील, अब्दुल शेख, केशव कदम हे होते. तर नाशिकहून मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, संदीप भवर, महेश लासुरे, अनंत सांगळे, अमित गांगुर्डे, मनोज घोडके आदींचा समावेश आहे.

आधीच अवकाळी पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला आणखी किती नाडणार, या शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालायचे काम सरकारने करायला हवे आणि त्यासाठी फक्त नाशिकमध्ये नाही तर सर्व कर्जधारक शेतकऱ्यांना व्याजात सूट द्यावी, अशी मागणी ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com