Sugarcane FRP : गेल्यावर्षीची २०३ कोटी रुपयांची एफआरपी थकीत

जिल्ह्यातील १८ कारखान्यांकडून शेतकऱ्यांना प्रतीक्षा
Last year's FRP of Rs 203 crore is due
Last year's FRP of Rs 203 crore is dueAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

सोलापूर ः गतवर्षीच्या गाळप हंगामात जिल्ह्यातील ३४ साखर कारखान्यांनी ऊस गाळप केला. आता यंदाचा हंगाम तोंडावर असतानाही त्यापैकी १८ कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांची पूर्णपणे एफआरपी (FRP) दिलेली नाही. या कारखान्यांनी शेतकऱ्यांची सुमारे २०३ कोटी रुपयांची एफआरपी थकविली आहे.

Last year's FRP of Rs 203 crore is due
Sugarcane FRP : थकीत ‘एफआरपी’ द्या, अन्यथा आंदोलन

जिल्ह्यात जवळपास ३६ साखर कारखाने आहेत. गतवर्षी त्यापैकी ३४ साखर कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळप केले. हा गाळप हंगाम पूर्ण होऊन आता तीन महिने झाले आहेत. तरीही शेतकऱ्यांना पूर्णपणे पैसे मिळालेले नाहीत. कायद्यानुसार गाळपानंतर १४ दिवसांच्या आत पूर्णपणे एफआरपी देणे कारखान्यांना बंधनकारक आहे. पण कारखान्यांनी हा कायदा पायदळी तुडवला आहे. अनेक कारखान्यांनी तरी दिलेले पैसेही तुकड्या-तुकड्यांनी दिले आहेत. तसेच विलंबाने मिळणारी एफआरपी कारखान्यांनी व्याजासह द्यावी, अशी तरतूद कायद्यात आहे. पण त्याचेही पालन होत नाही. प्रशासनही यावर गप्पच आहे. पण शेतकरी मात्र कारखान्यांकडे हेलपाटे मारत आहेत.

अर्धवट एफआरपी दिलेले कारखाने

गतवर्षीच्या एफआरपीची रक्कम अर्धवट दिलेल्या कारखान्यात ३१ ऑगस्टच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील पांडुरंग (माळशिरस), श्री सिद्धेश्वर (सोलापूर), संत दामाजी (मंगळवेढा), श्री विठ्ठलराव शिंदे (माढा), मकाई (करमाळा), संत कुर्मदास (माढा), दी सासवड माळी शुगर (माळशिरस), विठ्ठल कॅार्पोरेशन (माढा), इंद्रेश्वर शुगर (बार्शी), युटोपियन शुगर (मंगळवेढा), सहकार शिरोमणी (पंढरपूर), मातोश्री शुगर (अक्कलकोट), भीमा शुगर (मोहोळ), धाराशिव युनिट चार (सांगोला) आणि शंकर साखर कारखाना (माळशिरस) या प्रमुख कारखान्यांसह १८ कारखान्यांचा समावेश आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com