Jalgaon Market Committee Election Update : वर्चस्वासाठी नेत्यांचा आटापिटा मतदारांशी थेट संपर्क सुरू

Bajar Samiti Election : जळगाव बाजार समिती निवडणुकीत जळगाव, धुळे व नंदुरबारात सर्वत्र दोन पॅनेलमध्ये थेट लढत होत आहे.
APMC Elections
APMC ElectionsAgrowon

Jalgaon Election News : जळगाव बाजार समिती निवडणुकीत (Jalgaon Market Committee Election) जळगाव, धुळे व नंदुरबारात सर्वत्र दोन पॅनेलमध्ये थेट लढत होत आहे. फक्त तळोदा (जि.नंदुरबार) बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता मतदारांशी संपर्क साधण्यावर नेते व उमेदवार भर देत असून, निवडणुकीत चांगला रंग भरत आहे.

यंदाची निवडणूक अनेकांसाठी प्रतिष्ठेचीआहे. सोसायटी व ग्रामपंचायत मतदारसंघातील मतदारांची जातीनिहाय संख्या हाती घेऊन निवडून येण्यासाठी किती मते हवी आहे, याचे गणित उमेदवार, पॅनलप्रमुखांनी मांडले आहे. यानुसार निवडणुकीची रणनीती तयार केली आहे.

मेळावे घेण्यात आले आहेत. परंतु मतदारांशी थेट मोबाईलवरून संपर्क किंवा त्यांच्या घरी जाऊन मतांचा जोगवा मागितला जात आहे. जळगावात पॅनेलचे प्रमुख किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी थेट मोबाईलवर संपर्क करून मते मागत आहेत.

APMC Elections
Jalgaon Market Committee Election Update : उमेदवारीवरून पॅनेलमध्ये सुंदोपसुंदी पात्रता असलेल्यांना डावलल्याची चर्चा

सध्या जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील व महाविकास आघाडीच्या पॅनेलचे प्रमुख गुलाबराव देवकर जळगाव शहरातील आपापल्या संपर्क कार्यालयात शेतकरी, मतदारांच्या भेटी घेत आहेत. आपल्या पॅनेलची भूमिका व आपण केलेले काम याचे दाखले दिले जात आहेत.

नंदुरबारातही पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपापल्या स्तरावरून संपर्क राबविला आहे. शहादा (जि.नंदुरबार) येथील बाजार समितीतदेखील मतदारांशी नेत्यांनी संपर्क साधून आपली भूमिका मांडली आहे.

जामनेरात फारशी चुरस नाही. पण ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी धुरा आपल्या कार्यकर्त्यांवर सोपविली आहे.

रात्रीच्या वेळी दौरे...

गावोगावी रात्रीच्या वेळी पॅनेलमधील उमेदवार नेत्यांचा निरोप घेऊन मतदार, आपल्या कार्यकर्त्यांकडे जात आहेत. सकाळपासून मतदार शेतीकामे किंवा इतर कामात व्यस्त असतात. ही बाब लक्षात घेऊन नेते मंडळी रात्री भेटीचे नियोजन करीत आहेत.

यात अनेकदा गटागट कार्यक्रमदेखील आयोजिले जात आहेत. मतदारांची भेटही होते आणि मेजवानीदेखील देता येते, असा प्रयत्न पॅनलप्रमुख करीत आहेत. तसेच परिसरातील प्रसिद्ध धार्मिकस्थळीदेखील मतदारांना एकत्र करून वरणबट्टी, शेवभाजीचे कार्यक्रम घेतले जात आहेत. काहींनी मतदारांना आपापल्या भागातील शेतरस्ते तयार करन देण्याचे आश्वासनही देण्यास सुरवात केली आहे.

APMC Elections
Jalgaon APMC Election : जळगाव बाजार समितीतील उमेदवारांची नावे नेते जाहीर करेनात

तिसऱ्या उमेदवारामुळे अडचण

जळगाव बाजार समितीत काही नाराज उमेदवारांनी पात्रता असताना डावलल्याने माघार घेतलेली नाही. आपल्या पॅनलविरोधात जाऊन आपला अर्ज कायम ठेवला आहे. यामुळे नेत्यांची डोकेदुखी होत आहे.

जळगावात वसंत भालेराव यांचा अर्ज कायम असल्याने पालकमंत्री पाटील यांच्या पॅनेलमधील उमेदवाराची अडचण झाली आहे. अशा स्थितीत मतदारांना आपली बाजू योग्य असल्याचे पटवून देताना उमेदवारांची दमछाक होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com