Minister Sudhir Mungantiwar : खासगी बँकातून कर्जवाटपाचे प्रमाण कमी

Crop Loan : सन २०२२-२३ मध्ये खासगी बँकेने अतिशय कमी पीककर्ज वाटप केले आहे. त्यांच्या बँकेत असलेले शासकीय खाते तत्काळ काढून राष्ट्रीयीकृत बँकेत वर्ग करा.
Minister Sudhir Mungantiwar
Minister Sudhir MungantiwarAgrowon

Crop Loan In Chandrapur : सन २०२२-२३ मध्ये खासगी बँकेने अतिशय कमी पीककर्ज वाटप केले आहे. त्यांच्या बँकेत असलेले शासकीय खाते तत्काळ काढून राष्ट्रीयीकृत बँकेत वर्ग करा. पीक कर्जवाटपबाबत शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

नियोजन सभागृहात कृषी विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.

या वेळी आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, देवराव भोंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणाच्या (आत्मा) प्रकल्प संचालक प्रीती हिरुळकर, कृषी विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके यांच्यासह तालुका कृषी अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Minister Sudhir Mungantiwar
PDCC Bank Crop Loan : पुणे जिल्हा बँकेकडून एकाच महिन्यातच १३०० कोटींचे पीककर्ज

खरीप हंगामाला आता काही दिवसातच सुरुवात होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका. नकली बियाणे लावले तर शेतकऱ्याचे संपूर्ण वर्ष वाया जाते. जिल्ह्यात नकली बियाण्यांची आवक, वाहतूक व विक्री होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणेने सजग राहावे.

केवळ एक खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक घेतली म्हणजे प्रश्‍न सुटतात, असे समजू नका. वारंवार निर्माण होणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विभागाने समन्वयाने काम करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. कृषी क्षेत्रात जास्त काम करण्याची क्षमता ठेवून जिल्ह्याचा लक्षांक वाढवून घ्यावा.

तसा प्रस्ताव राज्यस्तरावर सादर करावा. आपल्या विभागाप्रती शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होणार नाही, याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी. ‘जय मिशन जय किसान’अंतर्गत आपला जिल्हा राज्यात पायोनिअर करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, जुलैमध्ये अल-निनोची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये पडणाऱ्या पावसावर होईल. कमी पाऊस झाला तर कसे नियोजन करायचे. जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याचा सिंचन आणि कृषी विभागाने अभ्यास करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

Minister Sudhir Mungantiwar
Crop Loan Update : नाशिक जिल्ह्यासाठी पीककर्जाचा ४२०० कोटींचा लक्ष्यांक जाहीर

८७८ कोटी ३३ लाख कर्जवाटप

जिल्ह्यात सन २०२२-२३ मध्ये पीक कर्ज वाटपाच्या १२९१ कोटी उद्दिष्टापैकी ८७८ कोटी ३३ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.

यात राष्ट्रीयकृत बँक १८४.७८ कोटी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ५७६.१६ कोटी, ग्रामीण बँक ८८.६३ कोटी, तर खासगी बँकांकडून २८.७६ कोटी रुपये कर्ज स्वरुपात वाटण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com