Pratap Chiplunkar : पिकांनाही सहजीवनाचा आनंद घेऊ द्या

तनमुक्त शेती कल्पना जुनी झाली, ती सोडा. पिकांनाही सहजीवनाचा आनंद घेऊ द्या, पण कसे देई धन हे जरा समजून घ्या, असा सल्ला ज्येष्ठ कृषी अभ्यासक प्रताप चिपळूणकर यांनी दिला.
Pratap Chiplunkar
Pratap ChiplunkarAgrowon

औरंगाबाद : संघर्ष करून उभी राहणाऱ्या पिकांची प्रतिकारशक्ती (Crop Immunity) वाढते. जमिनीत (Soil) पिकाशिवाय काहीच नको हे सोडून द्या. तनमुक्त शेती (Weed Free Agriculture) कल्पना जुनी झाली, ती सोडा. पिकांनाही सहजीवनाचा आनंद घेऊ द्या, पण कसे देई धन हे जरा समजून घ्या, असा सल्ला ज्येष्ठ कृषी अभ्यासक प्रताप चिपळूणकर (Pratap Chiplunkar) यांनी दिला.

Pratap Chiplunkar
Indian Agriculture : पोटासाठी शेतकरी बनला हमाल; शेतीचे प्रयोगही सुरू

ज्येष्ठ कृषी अभ्यासक प्रताप चिपळूणकर ५ डिसेंबर पासून विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. सीताफळ महासंघाने हा संवाद दौरा घडवून आणला. या दौऱ्यात सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी त्यांच्या सोबत आहेत. रविवारी (ता ११) पैठण तालुक्यातील देवगाव येथे शून्य मशागत तंत्राचा गत चार वर्षापासून आपल्या शेतात वापर करणारे दीपक जोशी यांच्या शेतात श्री चिपळूणकर यांनी औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील अभ्यासू व निवडक शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Pratap Chiplunkar
Agriculture Electricity : कृषिपंपांचे वीजजोड तोडू नका

यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेले प्रश्न व उपस्थित केलेल्या शंकांचे श्री चिपळूणकर यांनी शास्त्रोक्त पद्धतीने निरसन केले. श्री चिपळूणकर म्हणाले, की पिकांच्या मुळांना प्राणवायू मुबलक प्रमाणात मिळणे आवश्यक आहे. आपण सांगत असलेल्या शून्य मशागत तंत्रशेतीत ते शक्य आहे. एकदा जिवाणू जमिनीत टाकल्यानंतर ते वाढले पाहिजे. ते काम करतील की नाही याची खात्री देता येत नाही. परंतु त्यांच्या वाढीसाठीची पोषक अवस्था आपण जमिनीत निर्माण करणे आवश्यक आहे.

कोणत्याही जिवाणूच आयुष्य २० ते २५ दिवसाच्या आहे. जिवाणूंना निसर्गाने दिलेली ताकद समजून घेण्याची गरज आहे. पेरणीपूर्वीची चांगली मशागत म्हणजे नेमके काय हे समजून घ्या. शून्य मशागत तंत्राने जमिनीची जैविक मशागत १२ महिने २४ तास सुरू राहते. मोजता येणार नाही इतक्या जिवाणूंची निर्मिती निसर्गाने केली आहे. वाळवी शून्य ओलाव्यातही काम करते, ही निसर्गाचीच किमया म्हणावी लागेल.

जैविक मशागतीमुळे पेरणी व कापणी वेळी त्या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण सारखेच राहते. आपल्या उत्पादन खर्चाला प्रश्‍न करा, होणारा खर्च कमी करता येईल का याचा विचार करा, शोध लावत राहा शेती म्हणजे ढोर मेहनत नाही हे प्राधान्याने समजून घ्या. यावेळी श्री गट्टाणी यांनी राज्यातील सीताफळाचा विस्तार त्यावर प्रक्रियेच्या अनुषंगाने आपण महासंघ करत असलेले प्रयत्न यावर प्रकाश टाकला. आभार दीपक जोशी यांनी मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com