सावधानता मनी बाळगूया

सावधपण मज दे रामा... जर सावधानता बाळगली नाही तर आपण सहजासहजी फसलो जाऊ शकतो.
मशागत लेख
मशागत लेखAgrowon

सावधपण मज दे रामा... जर सावधानता बाळगली नाही तर आपण सहजासहजी फसलो जाऊ शकतो. लबाड, खोट्या, ढोंगी लोकांना ओळखायचं असेल तर एकच युक्ती आहे. ही लोक फक्त बोलतात, पण करत काहीच नाहीत. आश्‍वासने देण्यावर जास्तीत जास्त भर असतो या लोकांचा. पण प्रत्यक्षात काम करण्याची वेळ आल्यावर सगळं विसरतात. फक्त लोकांना गोड बोलून आपलेसं करणं, विश्‍वास राहावा म्हणून थोडीफार मदत करणं पण त्या मदतीमागे त्यांचा खूप मोठा स्वार्थ दडलेला असतो. हे वेळीच ओळखलेलं बरं. किंचितसं काहीतरी केलं की अशा लोकांना वाटतं मी खूप मोठं कामं केलं आहे. अहंकार तर इतका शिगेला पोहोचलेला असतो, की थोड्याशा कौतुकाने हुरळून जाणं अन् थोडं जरी अपयश आलं तर व्याकूळ होणं, त्रागा करून इतरांचे लक्ष वेधून घेणं हा अशा माणसांचा मूळ स्वभाव असतो.

मशागत लेख
Soybean : सोयाबीनच्या पेरणी क्षेत्राने ओलांडला सरासरी क्षेत्राचा टप्पा

एकवेळ तोंडावर आपली चूक दाखवणारी व्यक्ती मनाने खंबीर असते. अशा व्यक्तींच्या मनात आपल्याविषयी कटुता नसते. जे काही आहे ते सरळ सरळ असतं. गोडबोल्या माणसांच्या मनात प्रचंड कटुता असते पण ती त्यांना दाखवता येत नाही. मग ओठावर एक आणि पोटात एक अशी दोन ओझी सफाईदारपणे सांभाळून ही माणसे जीवनप्रवास करत असतात आणि हळूहळू इतरांना फसवत असतात.

मशागत लेख
Soybean Sowing : अकोला जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी अव्वल

आपल्या जबाबदारीची, कर्तव्याची जाण जर प्रत्येकाने ठेवली तर देश खूप पुढे जाईन पण हल्ली या जाणिवा बोथट होत चालल्या आहेत. करायचं म्हणून कामे उरकली जातात आणि अशा वृत्तीची साखळी बनत जाते. मग हळूहळू ही व्यवस्था पोखरली जाते. कितीही नाही म्हटलं तरी समाजात अशा विकृतीविरुद्ध आवाज कुणी उठवत नाही. जर का एखाद्या व्यक्तीने आवाज उठवला तर त्या व्यक्तीला वेगवेगळ्या समस्यांमध्ये अडकवलं जातं.

शासकीय अनेक योजना समाज, देश विकासासाठी असतात. पण खालपर्यंत या योजना खरोखर पोहोचतात का? ज्या गोष्टींसाठी आर्थिक तरतूद असते, ती त्यासाठी खरोखर पूर्णत्वास नेली जाते का? हा यक्षप्रश्‍न आहे. प्रत्येकानं समाजहित, देशहित जाणून पावले उचलली तर आश्‍वासनांची गरज पडणार नाही. आपोआप कामे होतील. यासाठी चांगल्या लोकांची साखळी निर्माण होऊन त्याप्रमाणे कार्यवाही होणं काळाची गरज आहे. प्रत्येकाला सूट हवीय मग तिचे स्वरूप वेगवेगळे असेल. पण सूट जर घेत बसलो तर देश प्रगतिपथावर जाईल का? चाकोरीबाहेर जाऊन कामे केली गेली, प्रत्येक काम माझं समजून केलं तर देश यशाच्या शिखरावर असेन.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com