एकत्र येऊन करू दुष्काळावर मात

आज १७ जून, हा दिवस जागतिक वाळवंटीकरण प्रतिबंध आणि दुष्काळ दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षी एकत्र येऊन करून करू दुष्काळावर मात अशी संकल्पना मांडण्यात आली आहे.
एकत्र येऊन करू दुष्काळावर मात
Water ConservationAgrowon

नीलेश सदार, वैभव पाटील

------------------

वाळवंटीकरण (Desertification) आणि दुष्काळ (Drought) यांचा शेती क्षेत्राशी अगदी जवळचा संबंध आहे. वाळवंट म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अति कोरडा आणि अतिशय कमी प्रजन्यमान असलेला प्रदेश. वाळवंटी भागात वनस्पती, वन्यजीवांचा आढळ अतिशय विरळ स्वरूपाचा असतो. पृथ्वीच्या एकूण भागापैकी सुमारे १८ टक्के भाग उष्ण वाळवंटी प्रदेशांनी तर १६ टक्के भाग थंड वाळवंट भागाने व्यापला आहे.

बदलते हवामान (Climate Change), जैवविविधतेचा (Biodiversity) ऱ्हास तसेच वाळवंटी आणि दुष्काळी क्षेत्राची होत असलेली वाढ हीदेखील चिंतेची बाबा ठरत आहे. या संदर्भात संयुक्त राष्ट्र संघानी १९९२ रोजी रिओ दि जानिरो येथे झालेल्या वसुंधरा परिषदेमध्ये ठराव मांडला. आणि त्यानुसार संयुक्त राष्ट्र संघ वाळवंटीकरण प्रतिबंधक परिषदेमार्फत याची अंमलबजावणी सुरू झाली. यानिमित्ताने दरवर्षी १७ जून हा दिवस ‘जागतिक वाळवंटीकरण प्रतिबंध दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचा मुख्य उद्देश वाळवंट आणि दुष्काळाच्या परिस्थितीबाबत लोकांमध्ये जागृता वाढविणे आणि, वाळवंटीकरण रोखून दुष्काळातून मुक्त होण्याच्या पद्धती अधोरेखित करणे असा आहे.

या वर्षी जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ दिनाचे आयोजन स्पेनमध्ये करण्यात येत आहे. या वर्षी ‘एकत्र येऊन करून करू दुष्काळावर मात’ ही संकल्पना मांडण्यात आली आहे.

सध्या जगभरातील सुमारे १६९ देशांमध्ये वाळवंटीय स्थिती निर्माण झाली आहे. वाळवंटीकरणामुळे हजारो हेक्टरवरील जमीन नापीक होत चालली आहे. त्यामुळे दुष्काळजन्य स्थिती उद्‍भवत आहे. वाढती लोकसंख्या आणि विकासाच्या नावाखाली नैसर्गिक साधनसंपत्तीचा बेसुमार आणि अमर्याद वापर होत आहे.

आज जगभरातील सुमारे २ अब्ज हेक्टरपेक्षा जास्त जमीन नापीक झाली आहे. या भागांतील सुमारे दीड अब्जाहून अधिक लोक या प्रभावाखाली आले आहेत. असे आंतरराष्ट्रीय अहवालातून नुकतेच समोर आले आहे. वाळवंटीकरण आणि दुष्काळी स्थितीबाबत लोकांमध्ये वेळीच जागरुकता निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे.

दुष्काळ, वाळवंटीकरणामागील कारणे ः

- दुष्काळ आणि वाळवंटीकरणावर मात करण्यासाठी जागतिक स्तरावर ठरविण्यात आलेल्या धोरणाची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

- जमिनीची होणारी धूप, अमर्याद वृक्षतोड, नैसर्गिक साधनसंपत्तीचा बेसुमार आणि अमर्याद वापर, एकाच जमिनीत सतत एकच पीक पद्धती घेणे, जंगलाची व सामाजिक वनीकरणाची होणारी अति चराई, वाढते औद्योगिकरण, अवकाळी पडणारा पाऊस या सर्व बाबींचा एकूणच पर्यावरणावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे दुष्काळासारखी परिस्थिती उद्‍भवताना दिसते.

- पर्यावरणाच्या होत असलेल्या ऱ्हासामुळे निसर्गाचा समतोल बघडत चालला आहे. त्यामुळे काही भागांत अतिपाऊस तर काही भागांत दुष्काळी परिस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून येते. अधिक काळ राहिलेल्या दुष्काळी स्थितीमुळे वाळवंटीकरण अनुभवास मिळते. याचा पृथ्वीवरील सर्वच सजीव घटकांवर मोठा परिणाम होतो.

उपाययोजना ः

- वाळवंटीकरण रोखण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा समतोल आणि शाश्‍वत वापर अत्यंत गरजेचा आहे.

- जमिनीची धूप रोखणे, नापीक ओसाड जागी वृक्ष लागवड, वृक्षांची बेसुमार होणार तोड थांबविली पाहिजे.

- शास्त्रीय पद्धतीने शेती करण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्यासाठी एकच पीक पद्धती न घेता पिकांची फेरपालट करणे, आधुनिक सिंचन पद्धती वापरून उपलब्ध सिंचनाच्या पाण्याचा कमी वापर, शेताच्या कडेने वृक्ष लागवड, बांध-बंदिस्ती करणे आदी बाबींचा समावेश होतो.

- ओढे, नाले, नदी किनारी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीवर भर दिला पाहिजे. जेणेकरून जमिनीची धूप होण्यास प्रतिबंध होईल.

-------------------

- नीलेश सदार, ९५२७२०२१२६

(कृषी वनस्पतिशास्त्र विभाग, डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com