Diwali Festival : अंतरीचा दिवा पेटवुया...

दिवाळी उत्सव हा मानवी मनाला चैतन्य देणारा उत्सव आहे. या दिवाळीच्या दिवसांत एक वेगळाच उत्साह मनात संचारलेला असतो. मन आनंदाने भरलेल असतं.
Diwali
DiwaliAgrowon

ज्योती आधाट/तुपे

दिवाळी उत्सव (Diwali Festival) हा मानवी मनाला चैतन्य देणारा उत्सव आहे. या दिवाळीच्या दिवसांत एक वेगळाच उत्साह मनात संचारलेला असतो. मन आनंदाने भरलेल असतं. हिवाळा ऋतूची चाहूल लागलेली असते. सकाळची थंडी, नंतर पडणारे कोवळे ऊन आणि हळूहळू आनंदाच्या भरात झालेली दिवसाची सुरुवात...

सारं काही विलक्षण असतं. कामामध्येच दिवस कसा संपून जातो हे कळतही नाही. स्वादिष्ट फराळ करताना गृहिणींची मात्र एक प्रकारची परीक्षाच असते. काही ठिकाणी अजुनही एकत्र येऊन एकमेकींच्या मदतीने फराळ तयार केला जातो. किती मजा असते एकत्र फराळ करण्यात.

Diwali
Crop Management : काढणीयोग्य पीक व्यवस्थापनातील या बाबी लक्षात घ्या

एकटीने करण्यात आणि सर्व जणींनी मिळून करण्यात खूप फरक आहे. सणांमागचे लपलेले अर्थ आपण शोधून त्याप्रमाणे जगायला हवं. प्रत्येक सण सर्वांना एका धाग्यात गुंफण्यासाठी साजरे करायचे असतात. ४-५ दिवस सुट्टी काढून सगळा परिवार एकत्र येतो. तेव्हा आनंदाला उधाण आलेलं असतं. मनाचे सर्व कप्पे प्रसन्नतेने भरले जातात.

सगळ्यांनी मिळून केलेली घराची सफाई, घरातली इतर कामे यामुळे एक प्रकारची ऊर्जा मिळते. आणि हीच ऊर्जा पुढे बरेच महिने टिकते. सण म्हणजे फक्त खाणे आणि फिरणे नसून, सण म्हणजे सर्वांशी मनमोकळ्या गप्पा मारणे, विचारांची देवाण घेवाण करणे, दररोजच्या धावपळीत बऱ्याचशा गोष्टी राहून गेलेल्या असतात. त्या या सुट्टीच्या निवांत क्षणी पूर्ण करायच्या असतात. नातेवाईक सोडून इतर अनोळखी भेटीही या दिवसात होतात. आणि या भेटींमधून आपल्या ज्ञानात निश्चित भर पडते.

दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. बाह्य प्रकाशासाठी प्रत्येकाच्या घरी दिवे तेवत असतात. अंतरीचा दिवा तेवत ठेवण्यासाठी आपण एकत्र येऊन सत्संग करायला हवा. सत्संगाबाबत वाचनात आलंय की, सत् म्हणजे ईश्‍वर किंवा ब्रह्मतत्त्व आणि संग म्हणजे सहवास! प्रत्यक्ष ईश्‍वराचा सहवास आपल्याला मिळणे अशक्य आहे; म्हणून संत ज्यांना ईश्‍वराचे सगुण रूप असे म्हणतात, त्यांचा सहवास हा सर्वश्रेष्ठ सत्संग असतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com