मन खंबीर करूया...

मनाची खंबीरता वाढवायची असेल, जीवनात सहजता आणायची असेल तर जीवनात हार, नकार पचवायला शिकूया. आताच १० वी आणि १२ वीचा निकाल लागला.
मशागत लेखौ
मशागत लेखौAgrowon

ज्योती आधाट /तुपे

मनाची खंबीरता वाढवायची असेल, जीवनात सहजता आणायची असेल तर जीवनात हार, नकार पचवायला शिकूया. आताच १० वी आणि १२ वीचा निकाल लागला. परीक्षेत ९९ टक्के मिळणारे हुशार आणि ३५ टक्के मिळणारे कच्चे असे लेबल लावणे आपण समाजातील एक जबाबदार घटक म्हणून थांबवूया. जिद्द, चिकाटी, मेहनत, सातत्य आणि आत्मविश्‍वासाच्या बळावर आपण आपलं ध्येय साध्य करू शकतो. अपेक्षेप्रमाणे गुण नाही मिळाले किंवा अपेक्षेप्रमाणे आपल्या आयुष्यात कुणी वागत नसेल अथवा आपल्या मनाप्रमाणे घडत नसेल तसेच नैराश्य आलं, कुणी रागवलं, एखादी वस्तू आपल्याला नाही मिळाली तर त्यावर आत्महत्या करणे हा पर्याय आहे का?

आपण पाहतो शेतकरी वर्गातही आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. खरंच आत्महत्येने प्रश्‍न संपतात की आणखी तीव्रतेने वाढतात हा प्रश्‍न आपण स्वतःला विचारूया. आणि समाजातील कोणताही घटक जर आत्महत्या करत असेल तर त्याला आपण सर्व जबाबदार आहोत. कारण आपण सिस्टिम साचेबद्ध केली आहे. ठरावीक पद्धतीने वागले तरच चांगले आणि नाही वागले तर वाईट. आणि यामुळे जगण्यातली निरागसता हळूहळू संपत चाललीय.

नामस्मरण, श्रद्धा, भक्ती या जीवनाचा आधार आहेत. मंदिरात गेल्यावर तिथली सकारात्मक ऊर्जा आपलं मन शांत करते. जीवनात कसाही प्रसंग येवो. आपण धीट मनाने सामोरे गेलं पाहिजे. आत्महत्या करताना आपले आई-वडील, जिवाला जीव देणाऱ्‍या आपल्या माणसांचा चेहरा एकदा मनात आठवा. नाही वाटणार जीव द्यावासा. किती सुंदर आयुष्य आहे. आणि आपण का भित्र्यासारखं आयुष्यातून exit घ्यायची. समोर आलेला प्रसंग आपल्याला आतुन मजबूत बनवण्यासाठी येतो. सगळेच दिवस आनंदाचे येत नसतात आयुष्यात. काहीतरी प्रतिकूल असतंच आणि ती प्रतिकूलता आपल्याला चॅलेंज असते. पण आपल्याला सगळं अनुकूलच हवंय. सगळं मनासारखंच हवंय. आणि अशा विचारांनी आपण आणखी कमकुवत मनाचे बनत जातो.

लहानपणीच जर आई वडिलांनी आपल्या लेकरांना नकार पचवायचं ट्रेनिंग हळूहळू द्यायला हवं.आपल्या मुलांनी एखादी गोष्ट मागितली की त्या क्षणी आपण त्यांना देतो. आणि मागितलं की मिळतं, हे एकदा का त्यांच्या मनावर बिंबल की मग नाही म्हणणं त्यांना सहन होत नाही. लहानपणी मग हे रूप थोडं सौम्य असतं पण मोठेपणी याच रूपांतर आत्महत्येत होत. हे कुठंतरी थांबायला हवं. आणि ती जबाबदारी आपणा सर्वांची आहे. पालक म्हणून आपल्या अपेक्षा आपल्या लेकरांवर लादणे कितपत योग्य आहे? आपल्या घरातील, आसपासच्या मुलामुलींशी मैत्री करून त्यांच्या जगण्यातली सकारात्मकता वाढवुया. आपले अनुभव त्यांना सांगून त्यांची मने अधिक बळकट करणं काळाची खूप मोठी गरज आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com