
Akola Fertilizer News : जिल्ह्यात कार्यरत असलेल्या कृषिसेवा केंद्रांची नियमितपणे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडून तपासणी मोहीम राबवली जात आहे.
या काळात अनियमितता आढळणाऱ्या कृषिसेवा केंद्र चालकांना सूचना देऊनही कारभार सुधारत नसल्याने कारवाई करण्यात आली आहे.
दोन कृषिसेवा केंद्रांचे महिनाभरासाठी निलंबन, तर एकाला ताकीद देण्यात आली आहे. अकोला व मूर्तिजापूर तालुक्यातील ही दोन केंद्रे आहेत.
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी निविष्ठा विक्रीचे परवाने कृषी विभागाकडून दिले जातात. अशा प्रकारचे परवाने घेऊन शेतकऱ्यांना योग्य प्रकारे कृषी निविष्ठा विक्री करणे अपेक्षित असते.
जिल्ह्यात बियाणे विक्रीचे ६९०, खतांचे ७१४ तर कीटकनाशक विक्रीचे ४५३ परवाने दिलेले आहेत. या विक्रेत्यांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा तसेच तालुक्यांना पथके नेमण्यात आलेली आहेत.
अशा प्रकारची तपासणी करणाऱ्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असता काही केंद्र बंद आढळून आले, तर काही ठिकाणी अनियमितता आढळून आल्या.
वर्षभरात १२ परवाने रद्द, २३ निलंबित
जिल्ह्याच्या कृषी विभागाला बियाणे, खते, कीटकनाशकांचे नमुने काढत तपासणीसाठी आयुक्तालयातून लक्ष्यांक देण्यात आला होता. त्यानुसार बियाण्यांचे ७५३ नमुने तपासण्यात आले. यात ५० नमुने अप्रमाणित आढळून आले.
त्यापैकी २६ प्रकरणात कोर्ट केस दाखल आहे. यातील २४ प्रकरणे ताकीद स्वरूपाची होती. रासायनिक खतांचे ३७४ नमुने तपासण्यात आल्यानंतर १५ अप्रमाणित नमुने समोर आले. रासायनिक खताच्या दोन प्रकरणांत पोलिसात गुन्हे दाखल झाले असून कारवाई सुरू आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.