Life : देखणी ती जीवने...

बाईपणाने लादलेल्या मर्यादा झुगारून त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात आभाळाएवढी उंची गाठली. या स्त्रिया असामान्य जीवन जगल्या आणि जगाच्या क्षितिजावर लखलखत्या दीपशिखा म्हणून तळपल्या.
Life
LifeAgrowon

मनीषा उगले

हा लेख तुमच्या हाती येईल तेव्हा या सरत्या वर्षातली अखेरची सकाळ झालेली असेल. या सदरातलाही हा शेवटचाच लेख. समारोपाचं हे पान तुमच्या हाती सोपवताना या क्षणी माझी मनःस्थिती व्याकूळ झालेली आहे. पण थांबणे हीच जीवनाची नियती आहे, मलाही थांबले पाहिजे.
वर्षभर ‘शक्ति रूपेण संस्थिता’ या सदरातून आपण जगभरातील कर्तृत्ववान स्त्रियांना नमस्कार करत होतो.

Life
Education System : ती आई होती म्हणुनी...

बाईपणाने लादलेल्या मर्यादा झुगारून त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात आभाळाएवढी उंची गाठली. या स्त्रिया असामान्य जीवन जगल्या आणि जगाच्या क्षितिजावर लखलखत्या दीपशिखा म्हणून तळपल्या. यातल्या कित्येक जणी आता देहरूपाने हयात नाहीत, काहींची नावे अजूनही जगाला पुरेशी ओळखीची नाहीत. असं असलं तरी त्यांचं काम इतकं महत्त्वाचं आहे, की प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्याचा आपलं जीवन सुकर करण्यात मोलाचा वाटा आहे.

Life
मार्केट इंटेलिजन्स आणि रिस्क कमिटी ः हीच ती वेळ, हाच तो क्षण...

कर्करोगाच्या उपचारासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या ‘हिला पेशी’ जिच्या शरीरातून जगाला मिळाल्या, त्या हेन्रीएटा लॅक्स हिचं नाव आपल्याला माहितीसुद्धा नसतं. पण आपल्या एखाद्या सुहृदाला तिच्यामुळे जीवनदान लाभलेलं असतं. वैद्यकीय क्षेत्रात मानाचं स्थान असलेल्या रेडियमचा शोध लावणाऱ्या आणि त्या संशोधनासाठी प्राणांचं मोल देणाऱ्या वैज्ञानिक मेरी क्युरी यांच्याबद्दल तरी आपल्याला कितीसं माहिती असतं? मुघल राजवटीतील सर्वांत निर्दयी सम्राट म्हणजे औरंगजेब, सत्तेसाठी त्यानं रक्ताचं गणगोत संपवायला सुद्धा मागेपुढे पाहिलं नाही.

पण राजसत्ता कितीही जुलमी असली, तरी आपल्या इवल्याशा शक्तीनिशी तिला शह देता येतो हे स्वतःच्या निर्भय कृतीतून दाखवलं ते त्याची मुलगी झेबुन्निसा हिने! अपघातामुळे अंथरुणाला खिळून राहण्याची वेळ आली तरीही कलेची साधना अखंडपणे सुरू ठेवणारी चित्रकार फ्रिदा काहलो हे तर उत्कट जीवननिष्ठेचं मूर्तिमंत उदाहरणच जणू!

Life
ती कुठे काय करते?

प्राचीन इजिप्तमधली विदुषी हायपेशिया, वाचताना अंगावर रोमांच उभे राहावेत असं तिचं विलक्षण चरित्र! आपल्या बुद्धिप्रामाण्यासाठी आणि ज्ञानोपासनेच्या हक्कासाठी अलेक्झांड्रियाची ही प्राध्यापिका सत्ताधीशांच्या रोषाला ताठ मानेने सामोरी गेली. त्यापश्‍चात मिळालेली मृत्यूची क्रूर शिक्षाही तिने शांतपणे स्वीकारली. कुठून आणत असतील इतकं आत्मबळ या बाया? आणि फ्रान्सची ती कोवळी पोर जोन ऑफ आर्क... तिच्यामुळे दशकानुदशके ब्रिटिशांकडून सातत्याने पराभूत होणाऱ्या फ्रान्सला स्वातंत्र्याची चव चाखता आली.

त्याचं फळ तिला काय मिळावं? प्रतारणा आणि मृत्युदंड? पोपसमोर एक माफीनामा दिला असता, तर तिचा मृत्युदंड टळू शकत होता. पण आपल्या तत्त्वांपासून यत्किंचितही न ढळता त्या मुलीने शूरपणे मरणाला कवटाळलं!
जगताना किरकोळशी गैरसोय झाली, तरी त्याचा केवढा बाऊ करतो आपण! कुठे या तेजस्वी शलाकांचं धीरोदात्त जीवन, कुठे आपलं तक्रारखोर जगणं!

पोरसवदा वयात वैधव्याची कुऱ्हाड कोसळली म्हणून कमलाबाई होस्पेट हातपाय गाळून बसल्या नाहीत, की माहेरच्या लोकांवर बिचारेपणाने भार बनून राहिल्या नाहीत. नागपुरात मातृसेवा संघाच्या माध्यमातून कितीतरी नवमाता, अनाथ बालकं आणि वृद्धांच्या त्या पालक झाल्या. ती इल्से कोहलर नावाची पुरातत्त्वशास्त्रज्ञ, जॉर्डनसारख्या दूरच्या देशातून उंटांचा अभ्यास करण्यासाठी इथे बिकानेरच्या वाळवंटात येऊन राहते काय, इथल्या पशुपालकांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून रात्रंदिवस मेहनत करून संशोधन करते काय!

Life
‘ती’ गुलाबी बोंडअळी नसून बोंडसड

सारंच थक्क करायला लावणारं आहे. तब्बल तीस वर्षे मायभूमी सोडून दुसऱ्या एखाद्या देशात जाऊन राहायचं आणि तिथल्या गुरा-माणसांसाठी काम करत राहायचं, यासाठी केवढं विशाल मन पाहिजे! नेली ब्लायने न्यू यॉर्कमधल्या चार भिंतींत सुखेनैव बसून पत्रकारिता नाही केली! तिथल्या एका मोठ्या इस्पितळात महिला मनोरुग्णांचा अमानुष छळ होतो हे समजल्यावर जिवावरची जोखीम पत्करत तिने तिथे शोधपत्रकारिता केली. मनोरुग्ण म्हणून स्वतः तिथला भयानक त्रास सहन करून बघितला. तिच्या कामाने सरकारला या प्रश्‍नात लक्ष घालणं भाग पडलं आणि त्यातून पुढे हजारो रुग्णांचं जीवन सुसह्य झालं.

गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी उत्तर अमेरिकेतली सोजर्नर ट्रुथ ही कृष्णवंशीय स्त्री तिथल्या दमनकारी व्यवस्थेशी आयुष्यभर भांडत राहिली. ती स्वतः एकटीच गुलामीतून मुक्त झाली असं नाही, तर इतर हजारो गुलामांना तिने बंधमुक्त होण्याची प्रेरणा दिली! आफ्रिकेच्या घनदाट जंगलांत पन्नासहून अधिक वर्षे राहून चिंपांझींवर संशोधन करणाऱ्या जेन गुडॉलच्या चरित्राचा तर एक वेगळाच विशेष पैलू मला दिसतो. जंगलात एकटीने संशोधनाला जाता येणार नाही अशी अट फेलोशिप देणाऱ्या संस्थेने घातल्यावर तिची आई वेन गुडॉल स्वतः लेकीसोबत जंगलात राहायला गेली, ‘बाईपणाची’ भीती घालून घरात नाही बसवलं तिला! एका बाईने दुसऱ्या बाईला उंबरा ओलांडायला मदत करणं हीच केवढी क्रांतिकारी गोष्ट आहे!

कुणाकुणाबद्दल आज लिहावं आणि किती? या इवल्याशा लेखात मावतील इतकी लहानसहान ही चरित्रं नव्हेतच. त्यांचा एकेक गुण इतका भव्य आहे, की तो उचलला तरी आपलं जीवन उजळून निघेल. केवळ वैयक्तिक उन्नयनाचा विचार न करता व्यापक समाजहितासाठी आयुष्य वेचणाऱ्या या साऱ्या थोर स्त्रियांकडे मानवतेसाठी केवढी करुणा होती! महेश एलकुंचवार यांचा ‘विश्‍ववात्सल्य’ हा सुरेख शब्दच या करुणेला चपखल शोभून दिसू शकतो. ज्या चरित्रांचा जागर आपण या सदरातून केला त्या सर्वांचाच आता इथे उल्लेख करणं शक्य नाही. पण त्या सर्वांनी वर्षभर जी ऊर्जा दिली आहे, ती आपल्याला अधिक माणूसपणाकडे नेणारी आहे. संपूर्ण ‘ॲग्रोवन’ परिवार आणि आपण सर्व सुहृद वाचकांनी माझ्या इथल्या दोन्ही सदरांतील लेखांना दोन वर्षं भरभरून प्रेम दिलंत, त्याबद्दल माझ्या मनात कृतज्ञता आहे.
नवीन वर्ष आपल्याला सुखाचं जावो. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com