Evergreen Music : जीवन गाणे गातच रहावे

चांगले संगीत हे अगदी सामान्य माणसाला आवडले पाहिजे, तेव्हा ते लोकप्रिय होते आणि वर्षानुवर्षे लोकांच्या हृदयात घर करून बसते.
Music
MusicAgrowon

शंकर बहिरट

चांगले संगीत हे अगदी सामान्य माणसाला आवडले पाहिजे, तेव्हा ते लोकप्रिय होते आणि वर्षानुवर्षे लोकांच्या हृदयात घर करून बसते. सध्याच्या टीव्ही आणि मोबाईलच्या (Mobile) शॉर्ट रीलच्या जमान्यात लोक रेडिओला (Radio) विसरत चालले आहेत. तसे पाहिले तर जुन्या जमान्यात रेडिओवर जे संगीत प्रसारित होई. त्यापेक्षा वेगळे काही ऐकायला मिळत नसे.

Music
Rural Social Structure: गाव शिवारात विसवलेली माणसं 

सध्याच्या इंटरनेटच्या युगात मात्र जगभरातले हवे ते संगीत भारतातील तसेच परदेशातील अनेक दुर्मीळ ध्वनिमुद्रणे अगदी चुटकी सरशी उपलब्ध असतात. तरुण पिढीने इंटरनेटवर जुने दुर्मीळ संगीत, जुनी गाणी शोधून ऐकली पाहिजेत कारण रसिकता जपणे हे जीवन समृद्ध करण्यासाठी महत्त्वाचे काम आहे. रसिकता नसणाऱ्यांचे आयुष्य निरर्थक असते.

लहानपणा पासूनच प्रत्येक आईने आपल्या मुलाला चांगल्या शिक्षणाबरोबर चांगले संगीत ऐकवले पाहिजे. जर्मन कवी गटे यांनी म्हटले आहे की तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावर कोणती गाणी आहेत हे मला सांगा. म्हणजे मी तुमच्या देशाचे भवितव्य काय आहे ते सांगतो. जर तरुणांच्या ओठावर देशभक्तिपर गाणी असतील तर देशाच्या भवितव्याविषयी शंका बाळगण्याचे काही कारण नाही.

मनावरचा ताण हलका करण्याचे संगीत हे रामबाण औषध आहे. उपासना, मनःशांती, एकाग्रता यासाठी संगीत महत्त्वाचे आहेच, संगीतामुळे विषमता, भेदभाव नाहीसे होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागते. माझ्या आईला रेडिओची भारी आवड. माझ्या लहानपणी ती रेडिओ ऐकता ऐकता शिलाई मशीनवर कपडे शिवायची.

आईमुळे रेडिओ माझ्याही आवडीचा विषय बनला. त्यावेळी त्यातले शब्द समजत नसले तरी संगीत ऐकावेसे वाटे. धनगरी ओव्या, लोकसंगीत, पोवाडे, भावगीते, भक्तिगीते, देशभक्तीपर गीते, हिंदी मराठी चित्रपट गीते असा अप्रतिम नजराणा असायचा. पुढे इंटरनेटचा जमाना आला. जगभरातल्या माहितीच्या स्त्रोतांबरोबरच संगीत प्रकारांची कवाडे खुली झाली. वेगवेगळ्या प्रदेशातील संगीत कसे असते ते शोधता येऊ लागले.

Music
Rural Development : माय मातीचा पर्यावरण, शैक्षणिक जागर

भाषा समजत नसली तरी कानाला गोड वाटणारे संगीत ऐकून आपण मंत्रमुग्ध होतो. संगीताला जात, धर्म, देश, भाषा असे कोणतेही बंधन नसते. आदिवासी बांधवांपासून शेतात राबणारा शेतकरी, कष्टकरी मजूर, शहरवासीय असो वा खेडूत, शिकलेला असो वा अडाणी, गरीब, श्रीमंत प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी श्रमपरिहारासाठी संगीताची महत्त्वाची भूमिका असते. आनंदाची परिसीमा गाठण्यासाठी किंवा दुःखाचा विसर पडण्यासाठी संगीत अवश्य ऐकले पाहिजे. शांता शेळके यांचे सुंदर गीत आहे.

जीवन गाणे गातच रहावे.

झाले गेले विसरुनि जावे

पुढे पुढे चालावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com