पुणे जिल्ह्यात अनेक भागांत हलक्या सरी

भिवडी मंडळात ५४, तर आंबेगाव मंडळात २९ मिमी पावसाची नोंद
पुणे जिल्ह्यात अनेक भागांत हलक्या सरी
Rain UpdateAgrowon

पुणे ः मॉन्सून (Monsoon) राज्यात दाखल होण्याची प्रतीक्षा असताना पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची (Cloudy Weather) स्थिती आहे. त्यामुळे वातावरणात वेगाने बदल होत आहेत. गुरुवारी (ता.९) सायंकाळी जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाने (Rain) चांगलीच हजेरी लावली. सासवडमधील भिवडी मंडळात ५४, आंबेगाव मंडळात २९ मिलिमीटर पावसाची (Rain Update) नोंद झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच मागील चार ते पाच दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. प्रामुख्याने पूर्व पट्ट्यातील शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती भागांत वादळी वाऱ्यासह कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता.१०) सकाळी आठ वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यातील पूर्व व पश्‍चिम भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. पूर्व भागाला उन्हाळ्यात जीवनदायी ठरणाऱ्या धरणपट्ट्यात पावसाचा प्रभाव वाढला आहे. पिंपळगाव जोगे, माणिकडोह, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, आंध्रा, पवना, कासारसाई, वरसगाव, पानशेत, वीर, टेमघर, नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जवळपास वीस मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला.

गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत असला तरी काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडत आहे. खरीप पेरणीसाठी पोषक हवामान तयार होत असल्याने शेतकऱ्यांनी शेतीकामांना वेगाने सुरुवात केली आहे. काही ठिकाणी पिकांच्या पेरणीसाठी हा पाऊस पोषक असल्याचे मत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

पश्‍चिम भागात काही ठिकाणी पाऊस कमी

पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांत पावसाचा जोर कमी आहे. उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस आहे. पूर्वेकडील पुरंदर या तालुक्यांत हलका पाऊस पडला आहे.

शुक्रवारी (ता.१०) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

थेऊर-१०, उरुळी कांचन-८, खेड शिवापूर-२, मुठा-७, भोर-४, भोलावडे-३, वेळू-२४, संगमनेर-१, काळे-५, कार्ला-२, खडकाळा-३, शिवणे-२, पानशेत-१२, विंझर-१, आंबवणे-३, जुन्नर-८, राजूर-१, डिंगोरे-६, आपटाळे-११, ओतूर-१०, वाडा-२, राजगुरुनगर-१५, कुडे-१३, घोडेगाव-२, आंबेगाव-२९, कळंब-७, पारगाव-१२, मंचर-१३, सासवड-३०, कुंभारवळण-४, परिंचे-१०, राजेवाडी-४

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com