Lokpanchayat Sanstha : अडचणींचा सामना करत उभी असलेली लोकपंचायत संस्था !

जलसंधारण, सेंद्रिय पीक उत्पादन, जैवविविधता, देशी बियाणे संग्रह, पशुसंवर्धन, महिला सक्षमीकरण, प्रक्रिया- मूल्यवर्धन आणि तांत्रिक शिक्षण- प्रशिक्षण अशा विविध क्षेत्रांत संस्थेनं मोलाची कामगिरी बजावली आहे.
Lokpanchayat Sanstha
Lokpanchayat SansthaAgrowon

या धरतीचे पाईक आम्ही, इथे पिकवतो सोने हो

श्रमतो, खपतो, घाम गाळितो, घेऊन सुंदर गाणी हो

जुन्या पिढीतील प्रसिद्ध कवी सूर्यकांत खांडेकर (Surykant Khandekar) यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावर लिहिलेल्या गीताच्या या ओळी आहेत. संगमनेर (जि. नगर) येथील लोकपंचायत या स्वयंसेवी संस्थेचं काम (Swayamseve Sanstha) बघितलं की या ओळी प्रत्यक्षात उतरल्याची अनुभूती येते. तब्बल तीस वर्षांपासून ही संस्था संकटं, आव्हानांचा सामना करीत चिकाटीने कार्यरत आहे. कोणतीही भक्कम राजकीय, आर्थिक पार्श्‍वभूमी नाही.

सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या जिद्दी, ध्येयनिष्ठ कार्यकर्त्यांच्या फळीतून संस्थेचा पाया रचला गेला. जलसंधारण, सेंद्रिय पीक उत्पादन, जैवविविधता, देशी बियाणे संग्रह, पशुसंवर्धन, महिला सक्षमीकरण, प्रक्रिया- मूल्यवर्धन आणि तांत्रिक शिक्षण- प्रशिक्षण अशा विविध क्षेत्रांत संस्थेनं मोलाची कामगिरी बजावली आहे.

Lokpanchayat Sanstha
Lumpy Skin : राज्यात ‘लम्पी स्कीन’ नियंत्रणात

संस्थेचे मुख्य संस्थापक आणि कार्यकारी विश्‍वस्त सारंग पांडे हे पिंपळगाव माथा (ता. संगमनेर) या गावचे. बी.कॉम. व विकास नियोजन पदविकेसोबतच गावपरिसर हेच आपले कुटुंब असे संस्कार अंगी बाणलेल्या पांडे यांनी समविचारी सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम सुरू केलं. त्यातून १९९३ मध्ये लोकपंचायत संस्थेची स्थापना झाली. दुष्काळाशी सामना करणं हा संस्थेचा मुख्य उद्देश होता. त्या काळात दुष्काळ मोठ्या प्रमाणात पडायचे. ग्रामीण जीवन हलाखीत असायचं. पांडे सांगतात, की महाविद्यालयीन शिक्षणानंतर सामाजिक संघटनांकडे ओढला गेलो.

Lokpanchayat Sanstha
Lumpy Skin : नांदेडमध्ये ४८ जनावरांचा लम्पी स्कीनमुळे मृत्यू

पंचविशीत होतो. राष्ट्र सेवा दल, बाबा आमटे यांचं कार्य जवळून अनुभवलं. पुण्याची ग्रामायण संस्था, दौंड तालुक्यातील आबा करमरकर यांच्यासोबत काम केलं. लक्षात आलं की महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती पाहता मोठे बंधारे, धरणं बांधण्याला मर्यादा आहेत. पावसाच्या पाण्याचंच योग्य संवर्धन केलं तर शेतीसाठी संरक्षित पाणी मिळण्याची खात्री होती. राळेगणसिद्धी आणि औरंगाबाद भागात असे प्रकल्प अभ्यासले. त्या प्रेरणेतून संगमनेर व नगर तालुक्यांतील १२- १३ गावांत सर्वकष पाणलोट विकास कार्यक्रमातून माथा ते पायथा जलसंधारणाचे उपचार केले. अकोले तालुक्यात तलावांतील गाळ काढण्याचं काम झालं.

पहिली १० वर्षे कामांचा ‘फोकस’ जलसंधारण हाच राहिला. शेतीला पाणी उपलब्ध झालं. आता पुढचं पाऊल टाकायचं होतं. पाणी आलं की मोटर-पंप, पाइपलाइन, नगदी पिकं असं भांडवल वाढत जातं. त्यात बदलतं हवामान आणि बाजारभाव या गोष्टी शेतकऱ्याच्या हातात नसतात. या अनिश्‍चिततेतून त्याला बाहेर काढायचं होतं. उत्पादन खर्च कमी करायचा होता. आणि जमिनीचा पोतही टिकवायचा होता. त्या दृष्टीने स्थानिक भागाला अनुकूल शाश्‍वत सेंद्रिय शेती पध्दती राबवण्याचं ठरवलं.

श्री. अ. दाभोलकर परिवार तसेच अन्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. ग्रामविकास ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवत शेतकरी, महिला, तरुण अशा सर्वांना सोबत घेतलं. बचत गट कार्यक्रम पुढे आणला. महिलांनी केवळ श्रमांपुरतं मर्यादित राहू नये, ग्रामसभेला यावं, पाणलोट नियोजनासह प्रक्रियेत भाग घ्यावा हा दृष्टिकोन ठेवला....

(सविस्तर लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com