Milk Dairy
Milk Dairy Agrowon

Dairy Milkometer: दूध उत्पादकांची लूट थांबणार; राज्य सरकार मिल्कोमीटर प्रमाणीकरण बंधनकारक करणार

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रभात कंपनी विरोधात झालेल्या आंदोलनात हा मुद्दा प्रामुख्याने लावून धरण्यात आला.

Milk Collection : दूध संकलन केंद्रावरील मिल्कोमीटर आणि वजन काट्यातून शेतकऱ्यांची लूट केली जाते. दूध उत्पादकांची लूट थांबवण्यासाठी राज्य सरकारने (State Government) मिल्कोमीटरचे नियमित प्रणामीकरण दूध कंपन्यांना बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंबंधी किसान सभेने (Kisan Sabha) राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर राज्य सरकारने किसान सभेला लेखी आश्वासन दिले आहे.

लॉंग मार्चच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात दिनांक १७ मार्च रोजी झालेल्या बैठकीतही हा मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व दुग्धविकास मंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

दूध संकलन केंद्रांवर दूध तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या सदोष मिल्कोमीटर व वजन काट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठी लूटमार केली जाते.

Milk Dairy
Milk Replacer: मिल्क रिप्लेसर म्हणजे काय?

दुधाचे भाव दुधातील फॅट व एस.एन.एफ.च्या प्रमाणानुसार ठरत असतात. फॅट व एस.एन.एफ. मोजण्यासाठी वापरण्यात येणारे मिल्कोमीटर हवे तसे सेट करता येत असल्याने सेटिंग बदलून दुधाची गुणवत्ता मारली जाते व त्याद्वारे शेतकऱ्यांची मोठी लूट करण्यात येते.

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, विविध शेतकरी कार्यकर्ते व किसान सभेने याबाबत अनेकदा आवाज उठवून राज्य सरकारचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले. किसान सभेकडून अनेकदा या प्रश्नावर आंदोलनेही करण्यात आली.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रभात कंपनी विरोधात झालेल्या आंदोलनात हा मुद्दा प्रामुख्याने लावून धरण्यात आला. अखेर दिंडोरी ते वाशिंद पार पडलेल्या किसान लॉंग मार्चमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

यानुसार मिल्कोमीटर व वजनकाटे, राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या विभागाच्या अंतर्गत असलेल्या नियंत्रण, वैधमापन शास्र या यंत्रणेमार्फत नियमित तपासण्यात येतील असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Milk Dairy
Mahanand Milk : ‘महानंद’चे ‘एनडीडीबी’मध्ये विलीनीकरण ः विखे पाटील

दूध उत्पादकांची लूटमार थांबविण्यासाठी दूध संस्थांना प्रमाणित मिल्कोमीटर वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय मिल्कोमीटर तपासणीसाठी स्वतंत्र निरीक्षकांची नेमणूक करण्याची कारवाई प्राधान्याने करण्यात येईल असे लेखी आश्वासन राज्य सरकारने किसान सभेला दिले आहे.

सद्य स्थितीत राज्यातील खाजगी दूध संघांवर शासनाचे नियंत्रण नाही. याबाबत संबंधितांसोबत बैठक घेऊन, दूध उत्पादकांची लूटमार थांबविण्यासाठी खाजगी क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल असेही यावेळी मान्य करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com