Crop Loss : नगरमध्ये साडेचार हजार हेक्टरचे नुकसान

नगर तालुक्यात पाच गावांना झळ बसली. १८ शेतकऱ्यांचे ११ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपर्यंत, तर ३९ शेतकऱ्यांचे ३९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
Crop Loss
Crop LossAgrowon

Nagar Crop Damage : अवकाळी पावसाने सोमवारी (ता. ६) आणि मंगळवारी (ता. ७) जिल्ह्यातील अनेक भागांत हजेरी लावली. जिल्ह्याच्या उत्तर भागात अवकाळीचा मोठा तडाखा बसला.

जिल्ह्यातील चार हजार ४७९.५० हेक्टरवरील रब्बी हंगामातील गहू (Wheat), मका (maize), हरभरा (Chana), टोमॅटो, कांदा, कोबी, संत्रा, आंबा या पिकांचे नुकसान झाले. आठ हजार ७९१ शेतकऱ्यांना या नुकसानीची झळ बसली.

नेवासे तालुक्यातील ५० गावांना अवकाळीचा तडाखा बसला. २४० शेतकऱ्यांचे ११० हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांपर्यंत, तर दोन हजार २१० शेतकऱ्यांचे ७७५ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. अकोले तालुक्यातील १५ गावांना झळ बसली.

२२७ शेतकऱ्यांचे १७४ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपर्यंत, तर एक हजार ६७४ शेतकऱ्यांचे ७०० हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले.

Crop Loss
Onion Rate : कांदाप्रश्नी दादा भुसेंनी तातडीची बैठक

कोपरगावमध्ये नऊ गावांमध्ये नुकसान झाले. २१ शेतकऱ्यांचे १२ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले. ३४ शेतकऱ्यांचे २५ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले.

नगर तालुक्यात पाच गावांना झळ बसली. १८ शेतकऱ्यांचे ११ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपर्यंत, तर ३९ शेतकऱ्यांचे ३९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. संगमनेरमध्ये पाच गावांना तडाखा बसला.

१३५ शेतकऱ्यांचे ८० हेक्टरवर पिकांचे ३३ टक्क्यांपर्यंत नुकसान झाले. राहाता तालुक्यात चार गावांना तडाखा बसला. ३० शेतकऱ्यांचे ४२ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले.

शेवगाव तालुक्यात तीन गावांमधील ४०५ शेतकऱ्यांचे २५३ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा नुकसान झाले. कर्जत तालुक्यात एका शेतकऱ्याचे अर्धा एकरमधील पिकांचे नुकसान झाले आहे.

Crop Loss
Onion Bajarbhav : शेतकऱ्यांकडून लाल कांदा खरेदी करा

राहुरी तालुक्यात सर्वाधिक नुकसान

जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने सर्वाधिक नुकसान राहुरी तालुक्यात झाले. राहुरीतील ५९ गावांना अवकाळीचा तडाखा बसला.

तीन हजार ५८ शेतकऱ्यांचे एक हजार ९१७ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपर्यंत नुकसान झाले. ६८२ शेतकऱ्यांचे ३४१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com