Grape Crop Damage : द्राक्ष झाली आंबट ! अवकाळी, गारपीठीनंतर हंगामाच्या अंतिम टप्प्यात सर्वकाही गमावले...

Crop Damage Due To Rain : द्राक्ष उत्पादक शेतकरी मागणी काही वर्षांपासून अडचणीत आहेत. अवकाळी पावसाने द्राक्ष घडातील मनी काळे पडल्याने व्यापारी माल खरेदी करण्यासाठी टाळाटाळ करू लागले आहेत. तसेच बेदाण्याचा उतारा घटल्याने बागेच्या केलेला खर्चही निघणार नाही.
Raisin Production | Grape Season
Raisin Production | Grape SeasonAgrowon

Climate change Effect on Crops : अतिवृष्टी, गारपीठ आणि अचानक वाढलेल्या तापमानाचा परिणाम होऊन यंदा राज्यात द्राक्ष आणि बेदाणा उत्पादनात मोठी घट झाली. यावर्षी द्राक्षांना म्हणावा तसा भाव मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यातच वादळी पावसाचे कारण पुढे करत व्यापारी कमी भावाने द्राक्ष खरेदी करू लागले आहेत. द्राक्षाला दर नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांनी बेदाणा तयार केला, पण बेदाणा उत्पादन यंदा प्रचंड झाले आहे. त्यामुळे बेदाण्याला मिळणार भाव उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

द्राक्ष उत्पादकांनी  आपल्या मागण्यांसाठी तीन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

Raisin Production | Grape Season
Grape Orchard Management : वाढत्या तापमानाचा द्राक्ष बागेवर काय परिणाम होतो?

महाराष्ट्रात द्राक्ष पिकाला अनुकूल वातावरण असल्याने सांगली, सोलापूर, नाशिक, पुणे जिल्ह्यांत सर्वाधिक द्राक्ष उत्पादन वाढले. त्यातून चांगले उत्पन्न मिळू लागल्याने अनेक शेतकरी द्राक्ष उत्पादनाकडे वळाले. मात्र, काही वर्षांपासून द्राक्ष शेतीला नजर लागली. त्यातही लाॅकडाऊनपासून द्राक्ष उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला होता. द्राक्षाला फारच कमी दर मिळायला लागला आहे. चिरमुरे 140 रुपये किलो आणि द्राक्षे 25 ते 30 रुपये किलो अशी स्थिती निर्माण झाली.

Raisin Production | Grape Season
Bedana Market : गोड बेदाणा होतोय कडू

यंदा अवकाळी पाऊस, गारपीट यासारख्या संकटातही शेतकऱ्यांनी आपल्या बागा टिकवल्या. वादळात झालेल्या हलक्या पावसाने द्राक्ष घडातील मनी काळे पडले. त्यामुळे युरोपच्या बाजारात भारतीय द्राक्षांला उठाव राहिला नाही. दुसरीकडे भारतीय बाजारपेठेतील व्यापारी माल खरेदी करण्यासाठी टाळाटाळ करू लागले आहेत. द्राक्षाला सरासरी ३० रूपये प्रतिकिलो दर दिला जात आहे.

नैसर्गिक संकटामुळे द्राक्षाचे उत्पादन कमी निघाले. उत्पादित मालाला बाजारपेठेत  द्राक्षला कमी भाव मिळल्याने आहे. त्यामुळे शेतकरी बेदाणा उत्पादनात वळला. पण द्राक्ष मण्यात साखरेचे प्रमाण कमी असल्याने तिथेही उतार कमीच राहिला, शिवाय दरातही फारशी सुधारणा नाही. १ किलो बेदाणा तयार करायला १५० रुपये खर्च येत असताना बाजारात व्यापाऱ्यांकडून १२० ते १३० रुपये भाव दिला जात आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. द्राक्ष आणि बेदाणा उत्पादकांना कर्ज माफीसह हमी भाव मिळाला तरंच शेतकरी वाचेल अशी भावना शेतकऱ्यांची आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com