
Satara Agriculture News : आले पीक घेणाऱ्या शेतजमिनीची सेंद्रिय कर्ब ०.७, ०.८ असल्यास रासायनिक खताची कार्यक्षमता वाढते. यामुळे आले पिकांचे उत्पादन चांगले मिळते. सध्या आले पिकांच्या दर तेजीत ही परिस्थिती सतत टिकत नसते. यासाठी आले पिकांचे व्यवस्थापन कमी खर्चात करणे गरजेचे असल्याचे मत बोरगाव कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भूषण यादगीरवार यांनी सांगितले.
सासपडे (ता. जि. सातारा) येथे दैनिक ॲग्रोवन व रिवुलिस इरिगेशन इं. प्रा. लि यांच्या संयुक्त विद्यमानाने आले पीक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. यादगीरवार बोलत होते.
यावेळी नागठाणे मंडल कृषी अधिकारी युवराज काटे, रिवुलिसचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ नितीन जाधव, ॲग्रोवन जिल्हा प्रतिनिधी विकास जाधव, वितरण प्रतिनिधी दत्ता जाधव, रिवुलीस व्यवस्थापक योगेश कुलकर्णी, सागर पिसे, किरण खोत, उमेश जाधव, नारायण डांगे, अशोक यादव, सोसायटी अध्यक्ष अनिल फाळके, मारुती यादव, मधुकर यादव, बाळकृष्ण यादव, कृष्णा यादव, सुभाष यादव आदी उपस्थित होते.
श्री. यादगीरवार पुढे म्हणाले, ‘‘आले पीक करीत असताना जमिनीची निवड महत्त्वाची असते, मात्र क्षेत्र कमी असल्यामुळे उपलब्ध जमिनीत पीक घेतले जात आहे. यासाठी जमिनीच्या प्रतवारीनुसार शिफारस असलेली भुसुधारक वापरली जावीत.
लागवड करत असताना बीजप्रक्रिया आवश्यक आहे. किमान ४० ते ४५ ग्रॅम वजनाच्या कंदाची लागवड करावी. लागवड करत असताना दोन कंदातील लागवड नऊ बाय नऊ अंतर असावे.
यापेक्षा कमी झाल्यास लागवड दाट होऊन करप्याचा प्रादुर्भाव होता. एक एकर क्षेत्रात २५ हजार रोपे असणे आवश्यक आहे. यातील २० हजार रोपे राहिली तरी अपेक्षित उत्पादन गाठणे शक्य आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.
कृषी विभागाचे काम हलके करत शेतकऱ्यांना कृषीचे आधुनिक तंत्र घरपोच करण्याचे काम आज ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून होत असल्याचेही श्री. यादगीरवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या आले पिकाविषयी शंकाचे निरसन केले. सूत्रसंचालन व आभार कृषी सहायक संतोष चव्हाण यांनी केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.