Onion Rate : ...अन्यथा कांदा उत्पादकांचा उद्रेक होईल

Kanda Bajarbhav: मागणीअभावी कांदा बाजारभावात अशीच घसरण सुरू राहिल्यास केंद्र व राज्य शासनाच्या ध्येयधोरणांबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.
Onion Farmers
Onion FarmersAgrowon

Nashik Onion Rate News : चालू वर्षी नाशिक, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांसह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक व पश्‍चिम बंगाल या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन झाल्याने देशांतर्गत कांद्याची मागणी कमी होत आहे.

परिणामी दिवसेंदिवस कांदा बाजारभावात (Kanda Bajarbhav) घसरण होत आहे. मागणीअभावी कांदा बाजारभावात अशीच घसरण सुरू राहिल्यास केंद्र व राज्य शासनाच्या ध्येयधोरणांबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.

त्यामुळे कोणत्याही क्षणी ‘रस्ता रोको’ किंवा आंदोलन होण्याची शक्यता आहे. या बाबत शिवसेना ठाकरे गटाचे निफाड तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देत लक्ष वेधले आहे.

मुख्यमंत्री शिंदे हे सोमवारी (ता. १३) मनमाड येथे दौऱ्यावर असताना पालकमंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून निवेदन देत साकडे घातले.

Onion Farmers
Onion Processing : शास्त्रज्ञांकडून कांदा प्रक्रिया, सिंचन तंत्रज्ञानासह प्रक्षेत्राची पाहणी

कांदा खरेदी-विक्रीसाठी लासलगांव बाजार समिती महत्त्वाची बाजारपेठ असून, येथे विक्रीस येणाऱ्या एकूण आवकपैकी ८५ ते ९० टक्के आवक ही कांद्याची होत असते.

कांदा आवकेपैकी ७० ते ८० टक्के कांदा निर्यातयोग्य असतो. जिल्ह्यातील इतर सर्व बाजार समित्या प्रायमरी मार्केट असल्याने येथे फक्त शेतकऱ्यांचाच शेतीमाल विक्रीस येतो.

प्रमुख मागण्या अशा...

१) राज्य सरकारने मार्केटिंग फेडरेशनमार्फत विशिष्ट दराने कांद्याची खरेदी सुरू करावी.

२) कांदा खरेदी करणे शक्य नसल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे अनुदान जाहीर करण्यात यावे.

३) कांदा निर्यातदारांकरिता केंद्र शासनाने यापूर्वी लागू केलेली १० टक्के कांदा निर्यात प्रोत्साहन योजना पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा.

४) ‘नाफेड’मार्फत तत्काळ कांदा खरेदी सुरू करण्यासाठी राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा.

५) देशांतर्गत किंवा परदेशात कांदा पाठविणाऱ्या खरेदीदारांना वाहतूक अनुदान देण्यासाठी राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे प्रयत्न करण्यात यावा.

६) बांगलादेश व श्रीलंका या देशांनी भारताकडून थेट कांदा खरेदी बंद केली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने या देशांसह इतर देशांमध्ये कांदा निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.

Onion Farmers
Kanda Chal : जाळीदार उभ्या चाळ तंत्राने वाढविली कांदा टिकवण क्षमता

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com