Lumpy : लम्पी आजार प्रतिबंधासाठी ठोस पावले उचला ; किसान सभेची मागणी

राज्य सरकारने लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टास्क फोर्स (Task Force) गठीत करावे, अशी मागणी किसान सभेने (Kisan Sabha) निवेदनात केली आहे.
Kisan Sabha
Kisan SabhaAgrowon

राज्यात जनावरांमधील लम्पी स्कीन आजाराने (Lumpy Skin Disease) थैमान घातले आहे. परिणामी राज्यातील पशुपालक आणि दूध उत्पादक (Milk Producers) चिंतेत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टास्क फोर्स (Task Force) गठीत करावे, अशी मागणी किसान सभेने (Kisan Sabha) निवेदनात केली आहे.

किसान सभेने या मागण्यां संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पशुधन मंत्री व कृषीमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. किसान सभेच डॉ अशोक ढवळे, जे पी गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ अजित नवले यांच्यावतीने सदर निवेदन देण्यात आले.

तसेच पशुधन विकास विभाग, महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या समन्वयाने तालुकास्तरावर कृती दल गठीत करून प्रतिबंध व उपचार या दोन्ही पातळीवर काम करावे.

आणि लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या भागांमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करावी. शेतकऱ्यांमध्ये विशेष जनजागृती करण्यासाठी तातडीने मनुष्यबळ तैनात करावे अशा मागण्या किसान सभा करत आहे.

जनावरांमध्ये वेगाने पसरणाऱ्या लम्पी स्किन आजाराने राज्यातील पशुधनाला विळखा घातला आहे. लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने राज्यातील पशुधन व दुग्ध व्यवसाय या आजारामुळे धोक्यात आला आहे.

राज्यातील 19 जिल्ह्यांमधील 218 गावे या आजाराने प्रभावित झाली आहेत. 34 जनावरांचा मृत्यू झाला आहे. हा आजार मोठ्या प्रमाणात संसर्गक्षम असल्याने प्रभावी उपाय योजना न केल्यास राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. शिवाय दुग्ध व्यवसाय कोलमडून पडू शकतो, असं किसान सभेने या निवदेनात सांगितले आहे.

राज्य सरकारने लम्पी प्रभावित भागाला 'नियंत्रित क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे. जनावरांची नियंत्रित क्षेत्रात किंवा त्या क्षेत्राबाहेर ने-आण करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

आजारग्रस्त जिवंत किंवा मृत जनावरांच्या संपर्कात आलेली वैरण नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

जनावरांचा बाजार, शर्यती, जत्रा, भरवण्यासही मनाई करण्यात आलेली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या उपायोजनांची काटेकोर अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे. मात्र केवळ एवढे करून भागणार नाही याची जाणीवही राज्य सरकारने ठेवण्याची आवश्यकता आहे, असल्याचंही किसान सभेच्या देण्यात आलेल्या निवदेनात सांगितले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com