‘महाबीज’चा २२ हजार हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित

परभणी विभागातील सहा जिल्ह्यांतील नियोजन
‘महाबीज’चा २२ हजार हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित
soybeanagrowon

परभणी ः यंदाच्या खरीप हंगामात (Kharif Season) ‘महाबीज’च्या (Mahabeej) परभणी विभागांतर्गत परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये विविध पिकांचा मिळून एकूण २२ हजार ५३२ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित आहे. एकूण २ लाख ७४ हजार ५५ क्विंटल बियाणे उत्पादनाचे (Seed Production) उद्दिष्ट आहे, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक डी. डी. कान्हेड यांनी दिली.

महाबीजतर्फे विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये दरवर्षी खरीप हंगामात सोयाबीन (Soybean), मूग, उडीद, तूर आदी पिकांच्या विविध वाणांच्या प्रमाणित आणि पायाभूत बियाण्याचा उत्पादन कार्यक्रम घेण्यात येतो. यंदाच्या प्रस्तावित बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक २१ हजार ६७१ हेक्टर असून, त्यापासून २ लाख ६३ हजार ५९९ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे. सोयाबीनच्या प्रस्तावित बीजोत्पादन क्षेत्रामध्ये परभणी जिल्ह्यात ७ हजार ११ हेक्टरपासून ८६ हजार ५०६ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये ६ हजार ६८ हेक्टर आहे. त्यापासून ७३ हजार ७२ क्विंटल बियाणे, नांदेड जिल्ह्यांमध्ये १ हजार ३३५ हेक्टरपासून १६ हजार ६३६ क्विंटल बियाणे, लातूर जिल्ह्यांमध्ये ४ हजार ४८२ हेक्टरपासून ५२ हजार ८३८ क्विंटल बियाणे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये २ हजार ५६९ हेक्टरपासून ३२ हजार ८३ क्विंटल बियाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये २०६ हेक्टरपासून २ हजार ४६४ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.

यंदा सोयाबीनच्या बीजोत्पादन कार्यक्रमात फुले संगम, केडीएस ७५३ (फुले किमया), एमएयूएस-१६२, एमएयूएस -१५८, एमएमएयूएस -७१, एमएयूएस-६१२, जेएस-३३५, डीएस-२२८ या वाणांचा समावेश आहे. तूर, मूग, उडीद, ज्यूट आदी पिकांचा मिळून ८३१ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम प्रस्तावित असून, त्यापासून १० हजार ४५६ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. तुरीच्या बीएसएमआर-७३६, बीडीएन-७११, उडदाच्या टीएयू-१, मुगाच्या उत्कृर्षा, बीएम-२००२-१ बीएम-२००३-२, ज्यूटच्या जेआरओ-५२४ या वाणांचा समावेश आहे. गतवर्षीच्या पावसात भिजल्यामुळे सोयाबीनमध्ये बियाणे नापासाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे प्रस्तावित बीजोत्पादन कार्यक्रमासाठी बियाणे कमी पडू शकते, असे सूत्रांनी सांगितले.

खरीप बीजोत्पादन प्रस्तावित क्षेत्र (हेक्टरमध्ये) बियाणे उत्पादन उद्दिष्ट (क्विंटलमध्ये)

जिल्हा...क्षेत्र...उत्पादन उद्दिष्ट

परभणी...७४०८...८९७१७

हिंगोली...६०९९...७३२९१

नांदेड...१२९९...१६९१६

लातूर...४७२५...५७८१८

उस्मानाबाद...२६८१..३३२०५

सोलापूर...२७९...३१०८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com