Water Conservation Scheme : महाराष्ट्राची जलसंवर्धन योजनांमध्ये आघाडी

Ministry of Water Power : २०१८ -१९ मध्ये केलेल्या पहिल्या सर्वेक्षणाचा अहवाल केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने जाहीर केला. यात देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील २४ लाखांहून अधिक जलस्रोताची मोजणी केली गेली.
Water
Water Agrowon

Water Conservation In Maharashtra : देशभरातील गोड्या पाण्याच्या जलस्रोतांसंदर्भात (तळे, टाक्या, तलाव आणि इतर जलसाठ्यांसंबंधी) २०१८ -१९ मध्ये केलेल्या पहिल्या सर्वेक्षणाचा अहवाल केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने जाहीर केला. यात देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील २४ लाखांहून अधिक जलस्रोताची मोजणी केली गेली.

जलस्रोतांच्या सर्व पैलूंविषयी माहिती जमा करून राष्ट्रीय माहिती कोश विकसित करणे, हा जलस्रोत गणनेमागील मुख्य उद्देश होता. यामध्ये महाराष्ट्रातील ९७ हजार ६२ जलाशयांची मोजणी झाली.

या अहवालानुसार जलसंवर्धन योजनांमध्ये महाराष्ट्र हा देशामध्ये आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले. त्यातही जलस्रोतांतील पाण्याचा विविध प्रकारांनी अधिक वापर करणाऱ्या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नाशिक या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे.

अहवालातील मुख्य मुद्दे

-जलस्रोतांचे विविध प्रकार - नैसर्गिक, मानवनिर्मित, त्यातही काही प्रमाणात बांधकाम किंवा पूर्ण बांधकाम असलेले इ.

- जलस्रोतांच्या वापरानुसार प्रकार - सिंचन अथवा औद्योगिक, मत्स्यशेती, घरगुती कामांसाठी-पिण्यासाठी, मनोरंजनात्मक, धार्मिक, भूजल पुनर्भरण इ.

-जलाशयांचा आकार व सद्यस्थिती

- त्यावर झालेल्या अतिक्रमणाचे प्रमाण

- साठवण क्षमता

-पाणीसाठ्यात भरणा करण्याची पद्धती

Water
Water Conservation : पाझर तलावाच तांत्रिक नियोजन कसं करायचं?

जलस्रोत गणनेतील ठळक नोंदी

१) देशपातळीचा विचार केला असता,

- देशभरात २४ लाख २४ हजार ५४० इतके जलस्रोत आहेत.

- देशातील एकूण जलस्रोतांपैकी ५९.५ टक्के (१४ लाख ४२ हजार ९९३) जलस्रोत तळी, टाक्या १५.७ टक्के (३ लाख ८१ हजार ८०५), इतर जलसाठे १२.१ टक्के (२ लाख ९२ हजार २८०), जलसंवर्धन योजना-पाझर तलाव-बंधारे ९.३ टक्के (२ लाख २६ हजार २१७), तलाव ०.९ टक्के (२२ हजार ३६१), इतर प्रकारच्या पाणी साठवण पद्धती २.५ टक्के (५८ हजार ८८४)

- जलस्रोतांपैकी ९७.१ टक्के (२३ लाख ५५ हजार ५५) जलाशय ग्रामीण भागातील. २.९ टक्के (६९ हजार ४८५) जलाशय शहरी भागात.

- देशात पश्चिम बंगाल राज्यामध्ये सर्वाधिक संख्येने तळी आणि इतर जलसाठे आढळले.

- पाणी टाक्यांच्या संख्येमध्ये आंध्र प्रदेश आघाडीवर आहे.

- सर्वाधिक तलाव तमिळनाडूमध्ये आहेत.

- दमण-दीव, दादरा, नगर हवेली, लक्षद्वीप हे भाग वगळता देशातील अन्य ३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जलस्रोतांची इतक्या तपशीलवार अशी गणना प्रथमच झाली.

- आंध्रप्रदेशमधील अनंतपूर आणि उत्तरप्रदेशातील सीतापूर या जिल्ह्यांचा जलाशयांचा अधिकाअधिक वापर करणाऱ्या जिल्ह्यांत समावेश आहे.

२) महाराष्ट्र राज्यामध्ये

- महाराष्ट्रात ५७४ नैसर्गिक (९४.४ टक्के म्हणजे ५६५ ग्रामीण भागात, तर १.६ टक्के म्हणजे ९ शहरी भागात) आणि ९६ हजार ४८८ मानव निर्मित जलस्रोतांपैकी ९९.३ टक्के म्हणजे ९५ हजार ७७८ ग्रामीण भागात, ०.७ टक्के म्हणजे ७१० शहरी भागात आहेत. तसेच बहुतांश मानव निर्मित जलस्रोतांचा मूळ खर्च ५ ते १० लाखांपर्यंत आहे.

- ५ वर्षांच्या काळात ५ हजार ४०३ जलाशयांपैकी ६३.२ टक्के म्हणजे ३ हजार ४१४ जलसाठे दरवर्षी पूर्ण क्षमतेने, ३५.८ टक्के म्हणजे १ हजार ९३५ जलाशये सहसा भरलेले, तर ०.७ टक्के म्हणजे ३७ जलाशये क्वचित पूर्ण, ०.३ टक्के म्हणजे १६ जलाशये कधीही पूर्ण क्षमतेने भरत नाहीत

- महाराष्ट्रातील सर्व जलस्रोतांपैकी ६०.७ टक्के म्हणजे ५८ हजार ८८७ जलाशय जिल्हा-राज्य सिंचन योजनांमध्ये समाविष्ट. त्यापैकी ९०.८ टक्के म्हणजे ५३ हजार ४४९ जलस्रोत जलसंवर्धन योजना-पाझर तलाव-बंधारे या प्रकारचे आहे. उरलेले ९.२ टक्के म्हणजे ५ हजार ५३८ जलस्रोत टाक्या, तलाव, जलसाठे आदी प्रकारचे आहेत

- वापरात असलेल्या जलस्रोतांपैकी ८२.५ टक्के म्हणजे ७९ हजार २३८ जलाशयांतील पाण्याचा फायदा एका शहर अथवा नगराला होतो. १७.१ टक्के म्हणजे १६ हजार ४०६ जलस्रोतांमुळे २ ते ५ शहरे-नगरांची पाण्याची गरज भागते. उर्वरित ०.४ टक्के म्हणजे ३८९ जलस्रोतांतील पाण्याचा लाभ ५ पेक्षा अधिक शहरे-नगरांना होतो.

- अहवालातील माहितीनुसार महाराष्ट्रातील २५१ जलस्रोतांच्या क्षेत्रात अतिक्रमण झाले असून त्यापैकी २३३ जलस्रोत जलसंवर्धन योजना-पाझर तलाव-बंधारे या प्रकारचे आहेत.

- जलस्रोतांच्या साठवण क्षमतेचा विचार करता महाराष्ट्रातील ९४.८ टक्के म्हणजे ९२ हजार २६ जलस्रोतांची साठवण क्षमता ० ते १०० घनमीटर या श्रेणीतील आहे. ४ टक्के म्हणजे ३ हजार ८८५ जलस्रोतांची क्षमता १०० ते एक हजार घनमीटर आहे

- सध्या वापरात असलेल्या जलस्रोतांमधील पाण्याच्या वापराची टक्केवारी : भूजल पुनर्भरण-७७.२, घरगुती वापरासाठी १३, सिंचन-८.३, मनोरंजन आणि धार्मिक- प्रत्येकी ०.१, इतर- १.३.

देशातील जलसंपत्तीचा आढावा

केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने देशभरामध्ये करण्यात आलेल्या जलस्रोतांच्या पहिल्या सर्वेक्षणाचे अहवाल नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहेत.

त्यात सहाव्या लघुसिंचन सर्वेक्षणाचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जलस्रोतांचा आकार, त्यांची साठवणक्षमता, स्थिती, त्यात झालेली अतिक्रमणे, या पाण्याचा होणारा वापर आणि त्यांच्या पुनर्भरणासंदर्भात सद्यःस्थिती अशा अनेक घटकांचा समावेश केल्यामुळे देशातील एकूणच जलसंपत्तीचा एकत्रित आढावा उपलब्ध झाला आहे.

पाणी हे सर्व जीवनाचा मुलाधार आहे. त्यावरच शेती आणि एकूण ग्रामीण अर्थकारणही अवलंबलेले आहे. देशातील वेगवेगळ्या प्रकारच्या गोड्या पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण सविस्तर असे सर्वेक्षण केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा प्रथमच हाती घेतले होते.

त्याचे दोन अहवाल नुकतेच प्रकाशित झाले आहेत. या अहवालामध्ये ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील जलस्रोतांचाही समावेश केला आहे. देशभरातील जलस्रोतांचे त्यांच्या पाणी वापरानुसार सिंचन, औद्योगिक, स्थानिक किंवा पिण्याचे पाणी, धार्मिक, मनोरंजन, भूजल पुनर्भरण आणि अन्य कारणांसाठीची पाणी साठवण असे बहुविध प्रकारांचाही विचार केला गेला आहे.

विशेष म्हणजे जलस्रोतांचे त्यांच्या स्थानानुसार अक्षांश रेखांश दर्शविणारे फोटो काढण्यासाठी एका खास मोबाईल अॅपचा वापर केला गेला.

या सर्वेक्षणामध्ये देशातील २४,२४५४० इतक्या जलस्रोतांची पाहणी करण्यात आली.

ग्रामीण - २३,५५,०५५ (९७.१ टक्के)

शहरी भागामध्ये - ६९,४८५ (२.९ टक्के)

वापरात असलेले जलस्रोत --- ८३.७ टक्के (२०,३०,०४०)

वापरात नसलेले, वाळून चाललेले, दुरुस्तीपलीकडे बांधकामे ढासळलेले जलस्रोत --- १६.३ टक्के टक्के (३,९४,५००)

एकूण जलस्रोतांपैकी,

तलाव --- ५९.५ टक्के (१४,४२,९९३)

टाक्या --- १५.७ टक्के (३,८१,८०५)

साठवण तलाव --- १२.१ टक्के (२,९२,२८०),

जलसंवर्धन योजना, पाझर तलाव, बंधारे --- ९.३ टक्के, (२,२६,२१७),

तळी --- ०.९ टक्के (२२,३६१)

अन्य --- २.५ टक्के (५८,८८४)

पश्‍चिम बंगाल राज्यामध्ये सर्वाधिक तलाव आणि जलसंवर्धन तलाव असून, त्या पाठोपाठ आंध्र प्रदेशचा क्रमांक येतो. आंध्र प्रदेशामध्ये टाक्यांचे प्रमाण अधिक आहे. तमिळनाडूमध्ये सरोवरांचे प्रमाण अधिक आहे, तर महाराष्ट्र हे जल संवर्धनाच्या योजनांमध्ये आघाडीचे राज्य आहे.

तलाव

पश्‍चिम बंगाल --- ३०.८ टक्के (७,४७,४८०)

उत्तर प्रदेश --- १०.१ टक्के (२,४५,०८७)

आंध्र प्रदेश --- ७.९ टक्के (१,९०,७७७)

ओडिशा --- ७.५ टक्के (१,८१,८३७)

आसाम --- ७.१ टक्के (१,७२,४९२)

Water
Water Conservation Scheme : जल संवर्धन योजनांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

तलाव --- टाक्या --- सरोवर --- जलसाठवण --- जलसंवर्धन योजना, बंधारे

पश्‍चिम बंगाल --- आंध्र प्रदेश --- तमिळनाडू --- प. बंगाल --- महाराष्ट्र

उत्तर प्रदेश --- ओ़डिशा --- बिहार --- झारखंड --- आंध्र प्रदेश

आसाम --- हिमाचल प्रदेश --- कर्नाटक --- बिहार --- गुजरात

ओडिशा --- तमिळनाडू --- प. बंगाल --- ओडिशा --- तेलंगणा

झारखंड --- गुजरात --- ओडिशा --- आंध्र प्रदेश --- झारखंड

जलशक्ती सर्वेक्षण भाग २

जलस्रोताची व्याख्या -

सर्व नैसर्गिक रचना किंवा मानवनिर्मित भिंती किंवा बांधकामांच्या साह्याने अडवून साठवलेले पाणी म्हणजे जलस्रोत. त्यांचा वापर सिंचन किंवा अन्य बाबींसाठी (उदा. औद्योगिक, मत्स्यपालन, स्थानिक पिण्याचे पाणी, धार्मिक, भूजलाचे पुनर्भरण इ.) केला जातो. अशा सर्व पाणी साठवण करणाऱ्या घटकांचा या सर्वेक्षणामध्ये जलस्रोत (वॉटर बॉडीज) ही संज्ञा वापरलेली आहे.

यामध्ये बर्फाचे पाणी वितळणे, छोटे प्रवाह, पाऊस किंवा स्थानिक भागातून निर्माण झालेल्या सांडपाण्याचा संग्रह होतो. किंवा काही ठिकाणी ओढे, नाले किंवा नदीचा प्रवाह वळवून पाणी साठविण्यात येते.

तलाव (Pond) - लहान आकाराचा उथळ पाणी साठा. हा नैसर्गिकपणे किंवा छोट्याशा बांधकामाद्वारे तयार केला जातो. हे पार करण्यासाठी बोट किंवा नावेची गरज नसते.

सरोवर (Lake) - आकाराने मोठे व सर्व बाजूंने जमीन असलेला पाणीसाठा. हे तलावापेक्षा मोठा आणि खोल असते.

टाकी (Tanks) - तलावापेक्षा मोठे पण उथळ पाणी साठा. यात पावसाचे किंवा अन्य पाणी स्रोतातून (बोअरवेल) पाणी घेतले जाते.

पाणी साठवण (Reservoir) - हे सामान्यतः माणसांची खोदून, बांध व बंधारे घालून तयार केलेली रचना असते. विशेषतः सिंचन, ऊर्जा निर्मिती, पूर नियंत्रण किंवा अन्य कारणांसाठी निर्मिती केली जाते.

जलसंवर्धन योजना - विशेषतः पावसाळ्यातील पाणी साठवून त्याचा पुढील हंगामासाठी वापर करण्यासाठी केलेली पाणी साठवण होय. यात पाझर तलाव किंवा बांध, बंधारे, छोटी धरणे येतात. याची प्रामुख्याने भूजल पुनर्भरणासाठी निर्मिती केली जाते.

वरील सर्वेक्षणामध्ये खालील जलस्रोत वगळलेले आहेत.

१) समुद्र, खाऱ्या पाण्याचे सरोवर

२) नद्या, प्रवाह, धबधबे, कालवे इ. मुक्त वाहणारे प्रवाह

३) खाणीसाठी केलेल्या खोदकामामध्ये तात्पुरते साठलेले पाणी

४) जनावरांच्या पाणी पिण्यासाठी केलेल्या रचना

महाराष्ट्र

एका बाजूला अरबी समुद्राची किनारपट्टी लाभलेला पश्‍चिम- मध्य भाग म्हणजे महाराष्ट्र. त्याचा पश्‍चिमेचा एक कणा म्हणजे सह्याद्री पर्वतांच्या रांगा असून, उत्तरेकडे सातपुडाचा आधार आहे. याच रांगा पुढे भरनागड, चिरोली, गायखुरी रांगा या नैसर्गिकरीत्या पूर्वेची सीमा बनतात.

-लोकसंख्या आणि क्षेत्रफळामध्ये हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य.

जलस्रोताच्या पहिल्या सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या राज्यातील महत्त्वाच्या बाबी...

एकूण जलस्रोत --- ९७,०६२

त्यातील ग्रामीण भागामध्ये --- ९९.३ टक्के (९६,३४३)

शहरी भागामध्ये --- ०.७ टक्का (७१९)

देशातील सर्वाधिक जलसंवर्धन योजना महाराष्ट्रात आहेत.

जलस्रोताचे वर्गीकरण

तलाव --- ०.९

टाकी --- ३.९

सरोवर --- ०.४

जल साठवण --- ०.४

जलसंवर्धन योजना --- ९२.७

अन्य --- १.७

एकूण जलस्रोतांपैकी ९९.७ टक्के (९६,७६७) या सार्वजनिक असून, उर्वरित ०.३ टक्का (२९५) या खासगी मालकीच्या आहेत.

सार्वजनिक आणि खासगी जलस्रोतांचे विवरण

सार्वजनिक मालकीच्या जलस्रोताचे विवरण (टक्के)

राज्य जल संशोधन विकास/ राज्य सिंचन विभाग --- ५३.७

पंचायत --- ४२.७

अन्य शासकीय संस्था --- २.३

सहकारी संस्था --- १.२

नगरपंचायती --- ०.१

खासगी मालकीच्या जलस्रोताचे विवरण

व्यक्तिगत --- ५२,२

वैयक्तिक गटांची मालकी --- २८.१

अन्य खासगी संस्था --- १९.७

एकूण जलस्रोतांपैकी ९८.९ टक्के (९६,०३३) वापरामध्ये असून, उर्वरित १.१ टक्का (१,०२९) जलस्रोत हे वापरात नाही. ते सुकत चालले आहेत.

वापरानुसार जलस्रोतांचे वर्गीकरण

सिंचन --- ८.३

पिण्याचे पाणी व स्थानिक ---१३.०

मनोरंजन --- ०.१

धार्मिक --- ०.१

भूजल पुनर्भरण --- ७७.२

अन्य --- १.३

महाराष्ट्रामध्ये ५७४ नैसर्गिक आणि ९६,४८८ मानवनिर्मित जलस्रोत आहेत. एकूण संख्या - ९७,०६२

५७४ नैसर्गिक जलस्रोतांपैकी

९८.४ टक्के (५६५) हे ग्रामीण भागांमध्ये, तर

१.६ टक्का (९) गे शहरी भागामध्ये आहेत.

मानवनिर्मित ९६,४८८ जलस्रोतांपैकी ९९.३ टक्के (९५,७७८) हे ग्रामीण भागांमध्ये, तर उर्वरित ०.७ टक्का (७१०) हे शहरी भागांमध्ये आहेत.

मानवनिर्मित जलस्रोतांच्या निर्मितीची मूळ किंमत ही ५ ते १० लाख रुपयांच्या घरामध्ये आहे.

एकूण ९७,०६२ जलस्रोतांपैकी भरण्याच्या क्षमतेच्या नोंदी ५,४०३ इतक्या जलस्रोतांच्या घेण्यात आल्या. ५,४०३ जलस्रोतांच्या २०१७-१८ मध्ये घेतलेल्या माहितीनुसार,

पूर्ण क्षमतेने भरणारे --- ३३.२ टक्के (१,७९६)

३/४ क्षमतेने भरणारे --- ६५.३ टक्के (३,५२५)

१/२ क्षमतेने भरणारे --- ०.९ टक्का (५०)

१/४ क्षमतेइतके भरणारे --- ०.१ टक्का (७)

शून्य किंवा अत्यल्प भरणारे --- ०.५ टक्का (२५)

गेल्या पाच वर्षांच्या माहितीनुसार

५,४०३ जलस्रोतांपैकी,

दरवर्षी भरणारे --- ६३.२ टक्के (३,४१४)

सामान्यतः भरणारे --- ३५.८ टक्के (१,९३५)

कधीतरी भरणारे --- ०.७ टक्का (३८)

कधीही न भरणारे --- ०.३ टक्का (१६)

पाण्याखालील क्षेत्रफळानुसार वर्गीकरण

एकूण ९७,०६२ जलस्रोतांपैकी ९६,९४७ जलस्रोतांचा विस्तार या सर्वेक्षणामध्ये नोंदविण्यात आला.

०.५ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रफळ --- १६.९ टक्के

०.५ ते १.० हेक्टर क्षेत्रफळ --- ३५.३ टक्के

१ ते ५ हेक्टर क्षेत्रफळ --- ३५.२ टक्के

५ ते १० हेक्टर क्षेत्रफळ --- १०.७ टक्के

१० ते ५० हेक्टर क्षेत्रफळ --- १.५ टक्का

५० हेक्टरपेक्षा मोठे --- ०.४ टक्का

Water
Water Conservation : जलसंधारणासाठी पाझर तलाव का आहेत महत्त्वाचे ?

साठवण क्षमतेनुसार वर्गीकरण

एकूण जलस्रोतांपैकी

०-१०० वर्ग घनमीटर --- ९४.८ टक्के (९२,०२६)

१०० to १,००० वर्ग घनमीटर --- ४ टक्के (३,८८५)

१००० ते १०००० वर्ग घनमीटर --- ०.३ टक्का

१०००० वर्ग घनमीटरपेक्षा अधिक --- ०.९ टक्का

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com