Cotton Cultivation : महात्मा फुले कृषी विद्यापीठ करणार उन्हाळी कापूस लागवड

सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील आटपाडी, जत, सांगोला या भागांतील उन्हाळी कापूस लागवड १० वर्षांपासून बंद होती.
Cotton Cultivation
Cotton CultivationAgrowon

Nagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठ (Mahatma Phule Agricultural University) , राहुरी येथील कापूस सुधार प्रकल्पामार्फत गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी सांगली, सोलापूर जिल्ह्यांत उन्हाळी कापूस लागवड (Cotton Cultivation) प्रकल्प राबविण्यात येत आहे.

कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमातून साधारण ५०० एकरांच्या जवळपास ही लागवड (Kapus Lagwad) होईल. त्यासाठी कृषी विद्यापीठ सुधारित बियाणे संबंधित शेतकऱ्यांना विकत देणार आहे.

सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील आटपाडी, जत, सांगोला या भागांतील उन्हाळी कापूस लागवड १० वर्षांपासून बंद होती. मागील वर्षी सुरू केलेल्या या प्रकल्पातून कापूस लागवडीचे गतवैभव या भागाला प्राप्त झाले आहे.

मागील वर्षी ३०० ते ४०० एकर क्षेत्रावर उन्हाळी कापूस लागवड करण्यात आली. मागील वर्षीचे चांगले उत्पादन व प्रतिसादामुळे याही वर्षी कापूस लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. उन्हाळी कापूस लागवड व नियोजन या दृष्टीने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

Cotton Cultivation
Soybean, Cotton Rate : सोयाबीन, कापूस दरवाढीकडे शेतकऱ्यांच्या नजरा

यामध्ये शेतकऱ्यांना बियाणे देण्यात आले. तसेच लागवडपूर्व ते कापूस काढणीपर्यंत मार्गदर्शन करण्यात येईल. यासाठी आटपाडी तालुक्यातील शेतकरी, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती यांचेही सहकार्य लाभेल.

विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी लागवडपूर्व मार्गदर्शनासाठी आटपाडी - कवठे महांकाळ येथे भेट देऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. येत्या हंगामात उन्हाळी कापूस लागवड नियोजन व व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.

यासाठी विद्यापीठाच्या कापूस पिकाच्या विविध लांब धाग्याच्या वाणांचे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आले. या प्रकल्पातून उन्हाळी कापसाचे उत्पन्न वाढेल, अशी अपेक्षा विद्यापीठाच्या कापूस सुधार प्रकल्पातील शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.

कापसाचे क्षेत्र वाढण्यासाठी यंदाही महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कापूस सुधार प्रकल्पा अंतर्गत उन्हाळी कापूस लागवडीचा प्रयोग सांगली, सोलापूर जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे. साधारण ४०० ते ५०० एकरांवर ही लागवड होईल. कापूस उत्पादकांना हा प्रयोग मार्गदर्शक असेल.
डॉ. राजेंद्र वाघ, कापूस पैदासकार, महात्मा फुले कृषी विद्यापीठ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com