MLA Vijay Kumar Deshmukh : खरिपासाठी खते, बियाण्यांची पुरेशी उपलब्धता करा

Kharif Season : खरीप हंगामासाठी आवश्यक रासायनिक खते, युरिया व बी-बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध राहील, शेतकऱ्यांची कुठेही अडवणूक आणि फसवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

Kharif Season Solapur Update : खरीप हंगामासाठी आवश्यक रासायनिक खते, युरिया व बी-बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध राहील, शेतकऱ्यांची कुठेही अडवणूक आणि फसवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली.

उत्तर सोलापूर तालुक्याची तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक आमदार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहामध्ये झाली. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, तहसीलदार सैफन नदाफ, तंत्र अधिकारी कटके, कृषी अधिकारी रामचंद्र कांबळे उपस्थित होते.

Kharif Sowing
Kharip Meeting : खरीप आढावा बैठकीत शेतकऱ्याचा संताप अनावर

या बैठकीत विविध योजनांचा आढावा घेऊन आमदार देशमुख म्हणाले, की हंगाम आता तोंडावर आला आहे. खते-बियाणे त्यांना वेळेत पुरवली पाहिजेतच, पण अधिकाधिक शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा मिळेल, याकडेही लक्ष द्या. त्यासाठी जनजागृती मोहीम राबवा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिंदे यांनी जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांनी प्रास्ताविक करून सन २०२२-२३ मध्ये राबविलेल्या योजना व खर्चाचा आढावा सादर केला.

मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजनेच्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती पत्र आमदार देशमुख यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. याप्रसंगी महिला शेतकरी सौ. महानंदा शिंदे व शेतकरी घनशाम गरड यांनीही आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी अभिषेक सावते यांनी केले, तर आभार मंडळ कृषी अधिकारी कृष्णा थिटे यांनी मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com