Life : प्रेम माणसांवर करा

बाळाने घास चावण्याऐवजी तो तोंडातून बाहेर काढून हातावर घेतला आणि तोच हात आईच्या साडीला पुसला. त्याच क्षणी आईचे डोळे रागाने लाल झाले नि अनपेक्षितपणे बाळाच्या पाठीवर जोराने थाप मारली.
Life
Life Agrowon

दुशांत निमकर

Rural Story : दोन दिवसांपूर्वी शाळेला जायला निघाल्यावर गावात एका कुटुंबात (Family) गेलो असता तेथील दृश्य बघून मला आश्‍चर्य वाटले. अगदी ५-६ वर्षांच्या मुलाला आई जेवण भरवत होती.

जेवण करणारा छोटा बाळ मोबाईल बघण्यात मग्न (The little boy is looking mobile) होता. त्याची आई (Mother) त्याला एकेक घास तोंडात भरवत होती. एवढ्यात नकळत एक मिरचीयुक्त घास आईने बाळाच्या तोंडात घातला.

बाळाने घास चावण्याऐवजी तो तोंडातून बाहेर काढून हातावर घेतला आणि तोच हात आईच्या साडीला पुसला. त्याच क्षणी आईचे डोळे रागाने लाल झाले नि अनपेक्षितपणे बाळाच्या पाठीवर जोराने थाप मारली.

स्वतःच्या पोटच्या गोळ्याला कपड्यावर पडलेल्या डागामुळे मार खावा लागला. समज नसलेल्या बाळाने केलेले कृत्य जरी चुकीचे असले, तरी प्रेमाने समजावून सांगता आले असते;

पण तसे न करता बाळाला शिक्षा देणे हे योग्य नाही. यातून हाच निष्कर्ष निघतो, की आजचा मनुष्य वस्तूवर वाजवीपेक्षा अधिक प्रेम करतो आणि त्यापायी माणसावर रागावतो.

भौतिक वस्तू या गरजेनुसार वापरायच्या असतात, तर माणसं जपायची असतात. हा संदेश समाजाला देण्याची खऱ्या अर्थाने आता गरज आहे.

एकदा मित्राकडे गेलो असता तेथील प्रसंग बघूनही मला आश्‍चर्याचा धक्काच बसला. मित्राने अत्यंत महागडी अशी मोटार सायकल विकत घेतली.

पप्पा ऑफिसमधून आले म्हणून त्याच्या मुलाने पप्पांकडे धाव घेतली. पप्पा ज्या गाडीतून आले ती गाडी मुलाला इतकी आवडली, की मुलाच्या मनाला हायसे वाटले. मी व मित्र त्याच्या घरी येऊन गप्पा गोष्टी करण्यात, विचारपूस करण्यात दंग झालो.

Life
Rural Story : बहीण-भावाच्या नात्याची गोष्ट!

गाडीचे पेढे घेतले. चहा घेतला आणि गाडी घेतल्यामुळे मनस्वी अभिनंदन करून निरोप घेऊन परतीला निघालो. बाळ अक्षय याने मोटार सायकलला ओरबाडून टाकले. त्याच्या पप्पाचे त्याकडे लक्ष जाताच पप्पाने क्षणाचाही विचार न करता लोखंडी साखळीने त्याला मारले.

डोक्यावर मारल्याने रक्त ओसंडून वाहू लागले. तेवढ्यात त्याची आई येऊन त्याला घेऊन घरात आली आणि नेहमीच्या डॉक्टरांना बोलावून त्यावर प्रथमोपचार सुरू केला.

तेवढ्यात त्याच्या पप्पाला एवढी महागडी गाडी घेतलेल्या आनंदावर विरजण पडल्यागत झाले आणि काय ओरबडले? म्हणून बघू लागले तर ‘LOVE YOU PAPA’ असं त्या गाडीवर लिहिले होते.

तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले. या अशा अनेक घटनांमधून माणूस म्हणून समाजात जगतांना प्रेम हे वस्तूवर नको तर माणसांवर करायला शिकायला हवे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com