`तोवर मला मुख्यमंत्री करा` शेतकऱ्याचे थेट राज्यपालांना पत्र

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारची अवस्था खिळखिळी झाली आहे. राज्यात सत्ता मिळवण्यासाठी सुरू असलेल्या सत्ता नाट्यात शेतकरी भरडला जात आहे.
`तोवर मला मुख्यमंत्री करा` शेतकऱ्याचे थेट राज्यपालांना पत्र
Letter to Governor Agrowon

शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीमुळे राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikasa Aghadi) सरकारची अवस्था खिळखिळी झाली आहे. राज्यात सत्ता मिळवण्यासाठी सुरू असलेल्या सत्ता नाट्यात शेतकरी (Farmer) भरडला जात आहे. अशा अस्थिरतेच्या काळात राज्यातील सत्ता नाट्य संपेपर्यंत आपली प्रभारी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी बीड (Beed) जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांनी केली आहे. त्यासाठी या शेतकऱ्यांने बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यपालांना पत्र लिहिले आहे.

पत्र पाठवणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव श्रीकांत विष्णू गदळे असे आहे. त्यांनी २२ जून रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करणारे पत्र दिले होते. या पत्रासंदर्भातली माहिती गुरुवारी समोर आली. या पत्रात राज्याचे राज्यपाल माझ्या पत्राची दखल घेऊन मला सेवेची संधी देतील असा विश्वास या शेतकऱ्यांने व्यक्त केला आहे.

या पत्रात शेतकऱ्यांनी म्हंटले आहे की, "मी शेतकरी पुत्र श्रीकांत विष्णू गदळे राहता दहिफळ (वडमाऊली) तालुका केज, जिल्हा बीडचा रहिवाशी आहे. मी १० ते १२ वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात अग्रेसर आहे. शेतकरी गोरगरिबांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आहे. सध्या महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.

अशावेळी सरकारने तात्काळ मदत करणे अपेक्षित होती. मात्र ती मिळाली नाही. तरी आज मुख्यामंत्र्यांनी अडीच वर्ष सत्तेत राहून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलेलं आहे. राज्यावर नैसर्गिक आपत्ती कोसळली असताना सत्तेत राहून कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांना दिलेली नाही.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू अथवा प्रभावी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती न देता मला प्रभारी मुख्यमंत्री म्हणून संधी द्यावी. मी जनतेचे सर्व प्रश्न मार्गी लावेन. बेरोजगारी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार या सर्वांना न्याय देण्याचं काम मी करेन. विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण तात्काळ माझी नियुक्ती करावी ही विनंती."

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com