Malegaon Market Committee : मालेगाव बाजार समिती सभापतिपदी अद्वय हिरे

Nashik APMC Update : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेते तथा पॅनेलप्रमुख अद्वय हिरे यांची तर उपसभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव विनोद चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.
Malegaon Market Committee
Malegaon Market Committee Agrowon

Nashik Market Committee News : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेते तथा पॅनेलप्रमुख अद्वय हिरे यांची तर उपसभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव विनोद चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.

उपसभापतिपदी चव्हाण यांना संधी देऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी हिरे यांचा महाविकास आघाडी मजबूत करण्याचा संकल्प दिसून आला. विजयानंतर हिरे समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळत मोठा जल्लोष केला.

हिरे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्या गटाला धोबीपछाड दिला आहे. त्यानंतर सभापती, उपसभापती निवडीसाठी गुरुवारी (ता. २५) सकाळी अकराला निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रशासक जितेंद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समिती सभागृहात विशेष सभा झाली. सभेला अठरापैकी १५ संचालक उपस्थित होते.

भुसे समर्थक ‘आपल पॅनेल’चे संजय घोडके, भिका कोतकर व चंद्रकांत शेवाळे हे तिघे संचालक अनुपस्थित होते. शेळके यांनी सभेचा मसुदा वाचन केला. यानंतर सर्व नवनिर्वाचित संचालकांचा ओळख परिचय करण्यात आला.

Malegaon Market Committee
Pune APMC : पुणे बाजार समितीमध्ये बदल्यांचा हंगाम सुरू

निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर सभापतिपदासाठी अद्वय हिरे यांचा डॉ. उज्जैन इंगळे सूचक असलेला व रवींद्र सूर्यवंशी अनुमोदक असलेला तर उपसभापतिपदासाठी विनोद चव्हाण यांचा संदीप पवार सूचक व रवींद्र मोरे अनुमोदक असलेला असे दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकेक अर्ज दाखल झाला.

छाननीत अर्ज वैध ठरल्यानंतर हिरे व चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

सुरगाण्यात किसान विकास पॅनेलची सत्ता

सुरगाणाच्या सभापतिपदी सावळीराम पवार यांची तर उपसभापतिपदी सुभाष चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. सभापती-उपसभापती निवडीसाठी मंगळवारी (ता. २३) विशेष सभा झाली. पिठासीन अधिकारी कांतीलाल गायकवाड व सहायक निबंधक सुजित गायकवाड यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.

किसान विकास पॅनेलचे १६ संचालक बिनविरोध झाले असून, शिवसेना ठाकरे गटाला एक जागा मिळाली. नवनिर्वाचित संचालकांत सावळीराम पवार, सुभाष चौधरी, उत्तम कडू, तुळशीराम भोये, भरत पवार, अशोक भोये, राजूबाबा शेख, अबु मौलाना शेख, संजाबाई खंबायत, पारूबाई गावित, भिका राठोड, हिरामण गावित, पुंडलिक भोये, गौतम पगारिया, मोहन राऊत, भास्कर जाधव, मोहन गांगुर्डे यांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com