Packaging : पॅकेजिंगसाठी तागाचा वापर बंधनकारक

अन्नधान्यासाठी आता पूर्णपणे तागाच्या गोण्यांचा वापर केला जाईल. तर किमान २० टक्के साखर तागाच्या गोण्यांमध्ये साठविणे बंधनकारक होणार आहे.
Packaging
PackagingAgrowon

Navi Dellhi : पॅकेजिंगसाठी तागाचा वापर बंधनकारक करण्याच्या नियमांना केंद्र सरकारने (Central Government) मंजुरी दिली. यामुळे अन्नधान्याची १०० पॅकिंग तर साखरेची २० पॅकिंग तागाच्या गोण्यांमध्ये करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यासोबतच बाविसाव्या विधी आयोगाची मुदत ३१ ऑगस्ट २२४ पर्यंत वाढवण्याचाही केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात या निर्णयांना मान्यता देण्यात आली.

सरकारच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार १ जुलै २०२२ ते ३० जून २०२३ या ताग वर्षामध्ये पॅकेजिंगसाठी तागाचा वापर बंधनकारक करण्याच्या नियमांवर मंत्रीमंडळाने शिक्कामोर्तब केले.

Packaging
Jute Crop : ताग पीक जोमात

यामुळे अन्नधान्यासाठी आता पूर्णपणे तागाच्या गोण्यांचा वापर केला जाईल. तर किमान २० टक्के साखर तागाच्या गोण्यांमध्ये साठविणे बंधनकारक होणार आहे.

या निर्णयाचा फायदा ४० लाख ताग उत्पादक शेतकऱ्यांना होईल, असा सरकारचा दावा आहे. दरवर्षी शेतकऱ्यांकडून ८००० कोटी रुपयांचा तागाची खरेदी केली जाते.

तर तागाच्या गोण्या तयार करण्याच्या प्रक्रिया उद्योगामध्ये पावणेचार लाख कामगारांचा समावेश आहे. त्यांनाही याचा फायदा होईल.

पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, आसाम, त्रिपुरा, मेघालय त्याचप्रमाणे आंध्रप्रदेश आणि तेलंगानामध्ये तागाचे उत्पादन आणि वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने या क्षेत्रांना या निर्णयाचा लाभ होईल.

दरम्यान, २२ व्या विधी आयोगाला पुढील वर्षी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचाही निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाने आज घेतला. विद्यमान विधी आयोगाचा कार्यकाळ २० फेब्रुवारीला संपुष्टात आला होता. आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांनी नुकताच पदभार स्विकारला असून तपासणी आणि अहवालासाठी प्रलंबित प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

त्यापार्श्वभूमीवर आयोगाला मुदतवाढ देण्यात आली आहे. पहिल्या विधी आयोगाची स्थापना १९५५ मध्ये झाली असून वेळोवेळी आयोगाची पुनर्रचना केली जाते. आयोगाने आतापर्यंत २७७ अहवाल सादर केले आहेत.

यासोबतच, मंत्रीमंडळाने भारत आणि गयाना दरम्यान प्रवासी विमान वाहतकू सेवा कराराला देखील मान्यता दिली. हा करार लागू होण्यासाठी उभय देशांनी आवश्यक अंतर्गत प्रक्रिया पूर्ण केल्यावर राजनैतिक दस्तावेजांची देवाणघेवाण होऊन अंमलबजावणीला सरवात होईल. गयानामध्ये भारतीयांची संख्या लक्षणीय असून त्यांना या थेट विमानसेवेचा लाभ मिळू शकेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com