Mandeshi Foundation : दुष्काळाला भिडणारे माणदेशी फाउंडेशन

माण तालुक्यात २०१८-१९ मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. एरवी इथून लोक रोजगारासाठी हंगामी स्थलांतर करतात. पण वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे या कुटुंबांना कायमस्वरूपी स्थलांतर करण्याची वेळ येते की काय, अशी भीती निर्माण झाली.
Mandeshi Foundation
Mandeshi FoundationAgrowon

माणदेशी फाउंडेशन (Mandeshi Foundation) ही सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण (Drought) तालुक्यात काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. कुटुंबामध्ये व समाजामध्ये महिलांना बरोबरीचे व सन्मानाचे स्थान मिळावे, त्यांना आर्थिक व डिजिटल साक्षर (Digital Literacy) करावे यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. माणदेशी महिला सहकारी बँकेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम सुरू आहे. चारा छावणी, जलसंधारण या माध्यमातून शेतकऱ्यांसाठीही ही संस्था काम करत आहे.

Mandeshi Foundation
Wet Drought : सर्वत्र ओल्या दुष्काळाची भयाण स्थिती

माण तालुक्यात २०१८-१९ मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. एरवी इथून लोक रोजगारासाठी हंगामी स्थलांतर करतात. पण वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे या कुटुंबांना कायमस्वरूपी स्थलांतर करण्याची वेळ येते की काय, अशी भीती निर्माण झाली. १ जानेवारी २०१९ रोजी माणदेशी फाउंडेशन या संस्थेने शेतकऱ्यांना व त्यांच्या पशुधनाला मदत करण्यासाठी चारा छावणी सुरू केली.

Mandeshi Foundation
Wet Drought : हा ओला दुष्काळच !

वर्षाच्या सुरुवातीलाच चारा छावणी सुरू करण्याची ही पहिलीच वेळ होती. काही आठवड्यांतच ही चारा छावणी ७० किमी पेक्षाही जास्त अंतरावरून आलेल्या नऊ हजार जनावरे व अठराशे शेतकऱ्यांसाठी दुसरे घरच बनली. माणदेशी फाउंडेशनने २०१२ मध्येही १४ हजार जनावरे व तीन हजार शेतकऱ्यांसाठी अशीच चारा छावणी दीड वर्ष चालवली होती. माणदेशी फाउंडेशन ही संस्था या दुष्काळी भागातील लोकांसाठी मोठा आधार बनली आहे. चेतना सिन्हा यांनी १९९६ मध्ये ही संस्था सुरू केली.

सिन्हा यांचे बालपण मुंबई येथे गेले. त्यांचे शालेय शिक्षण मास्टर्स ट्युटोरियल हायस्कूलमध्ये झाले. त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी आणि अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी मुंबई विद्यापीठातून संपादन केली. जयप्रकाश नारायणांच्या समाजवादी विचारांकडे त्यांचा ओढा होता. आणीबाणीच्या काळात त्या अनेक आंदोलनांमध्ये सहभागी झाल्या.

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत सुद्धा त्या सहभागी झाल्या होत्या. त्यात त्यांना अटक होऊन तुरुंगवासही भोगावा लागला होता. काही काळ शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीची प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. १९८७ मध्ये म्हसवड येथे राहणारे चळवळीतील कार्यकर्ते विजयसिंह गुरव यांच्याशी त्यांचे लग्न झाले.

म्हसवडसारख्या दुष्काळी भागातील स्त्रियांना स्वतःच्या रोजच्या कमाईतून काही बचत करण्यासाठी महिला बँक असावी, असे वाटत होते. रिझर्व्ह बँकेच्या सर्व नियमांचा चेतना सिन्हा यांनी अभ्यास केला. आवश्यक भाग भांडवल जमवले. पण सर्व संचालिका निरक्षर असल्यामुळे त्यांचा बँकेचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने फेटाळला....

(सविस्तर लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com