
Aurangabad Mango News : श्रीलंकेतील आंबा बागायतदार व निर्यातदार (Mango Exporter) असलेल्या व्यक्तीला महाराष्ट्रातील आधुनिक पद्धतीने लागवड (Mango Cultivation Method) केल्या जाणाऱ्या आंबा लागवड व इतर तंत्रज्ञानाची भुरळ पडली आहे.
हे तंत्रज्ञान आपल्या शेतावर राबविण्यासाठी श्रीलंकन बागायतदाराने प्रसिद्ध आंबा, फळबाग तज्ञ व गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवानराव कापसे यांना थेट तंत्रज्ञान समजाविण्यासाठी श्रीलंकेला येण्याचे निमंत्रण दिले आहे.
माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक श्रीकृष्ण गांगुर्डे यांच्या संपर्कातून श्रीलंकेतील हातडुवा इस्टेट रानवाला मिथ्रीगाला येथील असांका नानायक्कारा या ७०० एकर आंबा बाग व निर्यातदार असलेल्या व्यक्तीने डॉ. कापसे यांची मंगळवारी (ता. १४) औरंगाबाद येथे भेट घेतली.
या भेटीदरम्यान असांका नानायक्कारा यांनी डॉ. कापसे यांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडील आंबा बागेत टीजेसी वाण असून, दोन झाडांमधील अंतर तुलनेने अति जास्त आहे, बागेला ठिबक नाही, हॉट वॉटर ट्रीटमेंट केल्यानंतर फळावर ठिपके पडतात.
शिवाय विमानानेच त्याची निर्यात केली जाते. महाराष्ट्रातील आंबा अतिघन लागवड तंत्रज्ञान प्रगत असून या तंत्रज्ञानाचा स्वीकार आपण आपल्या व इतर शेतकऱ्यांच्या बागेत करण्यासाठी उत्सुक असल्याचे स्पष्ट केले.
या तंत्रज्ञानाच्या आधारे आणखी ५०० एकरवर आपण आंबा लागवड करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी मार्चमध्ये डॉ. कापसे यांना श्रीलंकेला येऊन तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले.
डॉ. कापसे मार्च अखेर श्रीलंकेला जाणार असून त्या ठिकाणी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना पॅक हाऊस कसे असावे, त्याची हाताळणी कशी करावी, डिसेपिंग कसे करावे, प्रिक्युलिंग, कोल्ड स्टोअरेज, रायपनिंग चेंबरमध्ये आंबा कसा पिकवावा आदींविषयी तंत्रज्ञान समजावून सांगणार आहेत.
यावेळी त्यांच्यासोबत सह्याद्री फार्म नाशिकचे प्रतिनिधी असतील असे डॉ. कापसे म्हणाले.
गटशेती विस्ताराचीही देणार माहिती...
महाराष्ट्रात गटशेतीचे वारे वाहते आहे. या गटशेतिला अधिक सक्षम रीतीने राबविल्यास शेतकऱ्यांचा अर्थकारण मजबूत कसे होते याची माहिती उदाहरणासह डॉ. कापसे यांनी श्रीलंकेच्याअसांका नानायक्कारा यांना सांगितली.
ती पटल्याने गटशेतीचे हे मॉडेल श्रीलंकेत रुजवण्यासाठीही त्यांनी उत्सुकता दर्शविली असल्याचे डॉ. कापसे म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.