Mango Production : आंबा उत्पादन ५० टक्के घटण्याची शक्यता

पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागात प्रामुख्याने सुरगाणा पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व नाशिक तालुक्यांच्या विविध गावांमध्ये आंबा लागवडी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
Mango Production
Mango ProductionAgrowon

Nashik News : जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे आंबा हे प्रमुख फळपीक झाले आहे. मात्र मागील सप्ताहात तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील आंबा पिकाला (Mango Crop) मोठा फटका बसला आहे.

मोहरात असलेल्या आंबा पिकाचे नुकसान झाल्याने ५० टक्क्यांवर उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागात प्रामुख्याने सुरगाणा पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व नाशिक तालुक्यांच्या विविध गावांमध्ये आंबा लागवडी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

कृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात एकूण ४ हजार ९३४ हेक्टर क्षेत्रावर या लागवडी आहेत. तर प्रस्तावित उत्पादन हे ७७९४ टन असते. मात्र यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Mango Production
Crop Advice Mango : कृषी सल्ला : आंबा

वादळी वाऱ्यामुळे मोहरानंतर आंबा फळ लागून वाढीच्या अवस्थेत असताना अनेक भागांत मोहर झडून पडला तर लहान कैऱ्या वाऱ्यामुळे पडल्या. तर बुरशीजन्य रोगांचा विळख्यात लागवडी सापडल्या आहेत. आदिवासी पाड्यावरील आंब्याला चव व गुणवत्तेमुळे मागणी असते.

त्यामुळे मागील वर्षी आदिवासी पड्यावरील आंबा निर्यात झाला होता. गेल्या काही वर्षात मागणी असल्याने या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारणही सुधारले आहे. मात्र पावसाने फटका दिल्याने यावर्षी उत्पादनासह शेतकऱ्यांच्या एकंदरीत उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

जिल्ह्यातील आंबा लागवड

तालुका - लागवड (हेक्टर)

नाशिक - २०९

इगतपुरी- १८१.७३

पेठ - १,१९१.७

त्र्यंबकेश्वर- ५७५

निफाड - १३.५

तालुका लागवड (हेक्टर)

सिन्नर - ८४.३

येवला - १०

चांदवड - ६०

मालेगाव- १४८

सटाणा - ४१

नांदगाव - १२

कळवण - ८५

दिंडोरी - ३०८

सुरगाणा - २,०००

देवळा - १५

एकूण - ४,९३४.८६

Mango Production
Mango Fruit Fall : तापमानवाढीमुळे रत्नागिरीत फळ भाजण्यासह गळती
आजच्या घडीला आदिवासी पाड्यावरील शेतकरी आंबा पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहत आहेत. त्यानुसार गेल्या पाच वर्षांत आंब्याची मागणी वाढल्याने उत्पन्न वाढले. मात्र चालू वर्षी पावसामुळे उत्पादनाचे गणित बिघडले आहे. फक्त २० ते २५ टक्के उत्पादन हाती येईल, ७० टक्क्यांवर नुकसान आहे.
यशवंत गावंडे, आंबा उत्पादक, गावंधपाडा, ता. पेठ
यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या अडचणी वाढल्या. वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडांवर लागलेला मोहर मोठ्या प्रमाणात गळून पडला आहे. त्यामुळे ६० टक्क्यांवर उत्पादन घटणार आहे. त्यामुळे उत्पादन व उत्पन्नाचे गणित बिघडण्याची दाट शक्यता आहे.
अंबादास भोये, आंबा उत्पादक, निरगुडे, ता. त्र्यंबकेश्वर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com