Mango Pulp Rate
Mango Pulp RateAgrowon

Mango Pulp Rate : आमरसाच्या दरात किलोला ६० ते ७० रुपये वाढीचा अंदाज

Mango Market Rate : हापूसची आवक कमी; कॅनिंगच्या आंबा दरात ३० रुपयांनी सुधारणा

Ratnagiri Agriculture News : कोकणच्या हापूस आंब्याचा (Alphanso Mango) स्वाद वर्षभर चाखण्यासाठी अनेकजण आमरस खरेदीवर भर देतात. यंदा वातावरणातील बदलांमुळे हापूसचे प्रमाण कमी असल्याने दर चढेच राहिले आहेत. त्याचा परिणाम भविष्यात आमरसाच्या दरावर (Mango Pulp Rate) होण्याचा अंदाज आहे.

सध्या ३.१ किलोच्या डब्याला ६०० रुपये मोजावे लागत आहेत. चार महिन्यांनी तो ७८० ते ८०० रुपये खरेदी करावा लागणार आहे. किलोला सर्वसाधारण आमरसाचा (Aango Juice) दर ६० ते ७० रुपयांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

उत्पादन कमी असल्यामुळे यंदा हापूसचे दर सध्या चढेच आहेत. स्थानिक पातळीवरही हापूसला डझनाला ६०० ते ८०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

आंब्याबरोबरच यंदा आमरस आणि अन्य प्रक्रिया दरांवरही मोठा परिणाम अपेक्षित मानला जात आहे. आमरसाला देश-विदेशात मोठी मागणी आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात छोटे-मोठे प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात असून त्यावर उदरनिर्वाह चालतो. कॅनिंगचा (प्रक्रियेसाठीचा) आंबा खरेदी दर सध्या ६५ ते ७० रुपये किलो आहे. गतवर्षी हा दर ३७ ते ४० रुपये होता.

Mango Pulp Rate
Tur Rate : तुरीच्या दरात वाढीचा कल

मे महिन्याच्या अखेरीस हा दर थोडा कमी झाला होता. दर्जेदार आमरसाला बाजारात ३ किलो १०० ग्रॅमचा डबा सध्या ६०० रुपयांना मिळत आहे.

किलोला साधारणपणे १९० रुपये दर आहे. यावर्षी उत्पादन कमी असल्याने आणि वाढत्या महागाईचा परिणाम आमरसाच्या दरावर होणार आहे. कॅनिंगचा आंबा दर साधाणपणे तीस रुपयांनी वधारला आहे.

मजुरी, वाहतूक खर्चातही वाढ झाल्यामुळे १ किलोचा डबा १८० ते २०० रुपयांनी बाजारात विकावा लागणार आहे. दरम्यान २०२१ मध्ये ३.१ किलोचा आमरसाचा डबा ५२५ रुपये दराने मिळत होता. २०२२ ला त्यात ७५ रुपयांनी वाढ झाली होती.

आंबा उत्पादनात मोठी घट असून कॅनिंगचे दरही वधारले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. परिणामी आमरसाचे दरही काही प्रमाणात वाढवावे लागणार आहेत. पुढील हंगामात हे चित्र स्पष्ट होईल. यावर्षी कॅनिंगला आंबा कमी उपलब्ध आहे.
- आनंद देसाई, प्रक्रियादार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com