जळगावात अनेक प्रकल्प भरले

पाऊसमानाची टक्केवारी सुधारली; धरणांमधील साठ्याने पाणीटंचाई होणार दूर
Water
WaterAgrowon

जळगाव ः जिल्ह्यात हतनूर (Hatnur Dam), गिरणा (Girna Dam) या मोठ्या प्रकल्पांसह रावेरातील सुकी, मंगरूळ, गारबर्डी, जामनेरातील तोंडापूर हे प्रकल्प (Water Project In Jalgaon) जुलैत प्रथमच १०० टक्के भरले आहेत. पश्चिम भागातील काही प्रकल्प वगळता एरंडोलातील अंजनी, यावलमधील मोर, चोपड्यातील गूळ प्रकल्पातही जलसाठा वाढला आहे. यामुळे पाणीटंचाई (Water Shortage) दूर होईल, असे दिसत आहे.

Water
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई कधी

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २९८.४ मिलिमीटर अर्थात ४७.२ टक्के पाऊस झाला आहे. प्रमुख मध्यम प्रकल्प व धरणांत समाधानकारक साठा झाला आहे. गिरणा, हतनूर, गूळ या धरणांतून नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. गिरणा धरणातून अंजनी मध्यम प्रकल्पात पाणी सोडण्यात आले आहे. पारोळ्यातील बोरी, भोकरबारी हे प्रकल्प कोरडेठाक आहेत. तसेच पाचोऱ्यातील बहुळा, अग्नावती, चाळीसगामधील मन्याड प्रकल्पातील जलसाठाही हवा तेवढा वाढलेला नाही. यावल तालुक्यातील नींबादेवी मध्यम प्रकल्पदेखील ओव्हरफ्लो झाला आहे. सातपुड्यातील नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. जलसाठा ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. सततच्या पावसाने पावसाची टक्केवारी वाढली आहे. भिज पावसाने जमिनीतील ओलावा वाढला आहे. याचा चांगला लाभ पुढेही होणार आहे.

Water
‘हतनूर’चे वाहून जाणारे पाणी ओझरखेडा धरणात सोडा

तालुकानिहाय पाऊस

(टक्केवारी)

जळगाव--४४.९

भुसावळ--४३.५

यावल--४६.९

रावेर--४७.३

मुक्ताईनगर--५०.८

अमळनेर--४५.०

चोपडा--४७.६

एरंडोल--४४.५

पारोळा--४१.९

चाळीसगाव--५६.४

जामनेर--४६.३

पाचोरा--४७.७

भडगाव--६०.०

धरणगाव--३६.८

बोदवड--३६.७

एकूण ः ४७.२ (सरासरी)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com