Crop Damage In Marathwada : मराठवाड्यावर पुन्हा वादळी पावसाचे संकट

मराठवाड्याच्या विविध भागांत शुक्रवारी (ता. ७) रात्री आणि शनिवारी सकाळी वादळी पाऊस झाला. काही भागांत जोरदार गारपीट झाली.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्याच्या विविध भागांत शुक्रवारी (ता. ७) रात्री आणि शनिवारी सकाळी वादळी पाऊस (stormy rain) झाला. काही भागांत जोरदार गारपीट झाली. २४ तासांत वेगवेगळ्या भागांत वीज पडून एकूण ५४ जनावरांचाही मृत्यू झाला.

यामध्ये १५ लहान जनावरांचा समावेश आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांची रब्बीची पिके (Rabi Crop) शेतात उभी आहेत. काहींनी पिके काढून गंजी लावली. या पिकांसह भाजीवर्गीय आणि फळवर्गीय पिकांचे मोठे नुकसान झाले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६५ पैकी ६१ मंडळांत पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील अनेक भागांत शनिवारी पाऊस आणि गारपीट झाली. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातीलही काही भागांत गारपीट झाली.

लातूर तालुक्याच्या पश्चिम भागात म्हणजेच तांदुळजा, गाधवड, कानडी बोरगाव, भोसा नीळकंठ, सेवादासनगर येथे दुपारी चार वाजता जोरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडासह गारपीट झाली. अर्धातास मुसळधार पाऊस झाला.

काढणीस आलेल्या हरभरा, गहू, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तांदुळजा महसूल मंडळातील आंब्यांच्या बागांना गारपिटीचा तडाखा बसला.

Crop Damage
Eknath Shinde on Crop Damage: नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची दुपारी बैठक

धाराशिव जिल्‍ह्यातील कळंब तालुक्यातील शिराढोण परिसरातही मोठ्या प्रमाणावर गारपिटीने तडाखा दिला. वादळामुळे शिराढोण गावातील काही घरांवरचे पत्रे उडाली. वादळ आणि गारपिटीमुळे पिके व आंब्यांचे नुकसान झाले.

परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक मंडळांत शनिवारी दुपारी मेघगर्जना, वेगाच्या वाऱ्यासह अवेळी पाऊस झाला. पावसामुळे हळद, गहू, ज्वारी, फळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते.

शनिवारी सकाळी ११ ते १ च्या दरम्यान परभणी, जिंतूर, मानवत, पाथरी, सेलू, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील अनेक गावांत हलका ते मध्यम पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, औंढा नागनाथ, वसमत तालुक्यांतील अनेक भागांत पाऊस झाला.

बीड जिल्‍ह्यात अधिक नुकसान

बीड जिल्ह्यात शनिवारी वादळी वाऱ्यासह विजांचा प्रचंड कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे आंब्यासह फळपिकांचे, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले.

केज तालुक्यात विजा पडून पाच जनावरे मृत्युमुखी पडली. पंधरवड्यापूर्वी जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि काही भागांत गारपीट झाली होती. यामध्ये साधारण तीन हजार हेक्टरांवरील पिकांचे नुकसान झाले होते.

दरम्यान, शनिवारी दुपारनंतर जिल्ह्यातील केज, बीड, आष्टी, माजलगावसह इतर भागांत जोराचा पाऊस झाला. केज तालुक्यातील चिंचोलीमाळी महसूल मंडळात जोराची गारपीट झाली. रस्ते आणि शेतांमध्ये गारांचा खच साचला होता. बीड तालुक्यातील पोखरी भागातदेखील गारांचा पाऊस झाला. या भागात मोठमोठ्या गारा पडल्या.

Crop Damage
Hailstorm Crop Damage : विदर्भात गारपिटीचा पिकांना मोठा फटका

वीज पडून तिघांचा मृत्यू

परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांत शनिवारी (ता. आठ) वीज पडून प्रत्येकी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. परभणी जिल्ह्यातील मांडेवडगाव (ता. मानवत) येथे इंदुमती नारायण होंडे (वय ६०) या सकाळी साडेआठ वाजता त्यांच्या शेतात कापूस वेचत होत्या.

अचानक पाऊस सुरू होऊन वीज कोसळली. यात त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटेनत बीड जिल्ह्यातील सुरुडी (ता. आष्‍टी) येथे सायंकाळी पाचच्या सुमारास महादेव किसन गर्जे (वय ६०) यांचा वीज पडून मृत्यू झाला. या शिवाय बीड जिल्ह्यात दोन व्यक्ती जखमी झाल्या.

तिसऱ्या घटनेत हिंगोली जिल्ह्यात शेतात हळद गोळा करणाऱ्या बोरजा (ता. औंढा) येथील पिराजी विठ्ठल चव्हाण (वय ३३) यांचाही वीज पडून मृत्यू झाला.

पशुधनाची हानी अशी

छत्रपती संभाजीनगर - १३

बीड - १७

जालना- ४

धाराशिव - ७

नांदेड - ३

हिंगोली -१

लातूर - ९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com