Marathwada Apmc Election : बाजार समिती निवडणुकीची रंगत वाढली, आता लक्ष उमेदवारी अर्ज माघारीकडे

मराठवाड्यातील निवडणूक होऊ घातलेल्या बाजार समित्यांमधील विविध प्रवर्गातील जागांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपल्यानंतर छाननी झाली.त्यातून बाद झालेले अर्ज स्पष्ट झाल्यानंतर आता लक्ष माघारीकडे लागले आहे.
Beed Apmc Election
Beed Apmc ElectionAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील निवडणूक होऊ घातलेल्या बाजार समित्यांमधील (Market Committee) विविध प्रवर्गातील जागांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपल्यानंतर छाननी झाली.त्यातून बाद झालेले अर्ज स्पष्ट झाल्यानंतर आता लक्ष माघारीकडे लागले आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीनही जिल्ह्यांतील २१ बाजार समित्यांसाठी ही निवडणूक होते आहे. त्यामध्ये बीडमधील ९, छत्रपती संभाजीनगरमधील ७ व जालना जिल्ह्यातील ५ बाजार समितीचा समावेश आहे.

सहकारी संस्था मतदारसंघ, ग्रामपंचायत मतदारसंघ, व्यापारी-अडते मतदारसंघ व हमाल-मापाडी मतदार संघातून आपले प्रतिनिधी निवडून द्यावयाचे आहेत.

दाखल अर्जांच्या स्थितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७ बाजार समितीमधील विविध जागांसाठी सर्वाधिक १,३५०, जालना जिल्ह्यातील ५ बाजार समित्यांमधील एकूण जागांसाठी ५३८, तर बीड जिल्ह्यातील ९ बाजार समित्यांसाठी ११३५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

Beed Apmc Election
Nashik Apmc Election : अर्ज छाननी प्रक्रियेनंतर आता माघारीकडे लक्ष

जिल्हानिहाय दाखल व बाद अर्ज स्थिती

छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील ७ बाजार समित्यांमधून फुलंब्री दाखल १४८ पैकी ९ बाद १३९ स्वीकृत, वैजापूर २४२ पैकी १० बाद २३२ स्वीकृत , छत्रपती संभाजीनगर २२२ पैकी १९ अस्वीकृत रार १८१ स्वीकृत, गंगापूर १९६ पैकी व कन्नड बाजार समितीमधून दाखल २५० पैकी ३ पुन्हा प्राप्त तर शिल्लक असलेल्या २४७ अर्जापैकी २१ बाद झाले तर २२६ मंजूर झाले.

पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती मधून दाखल १२९ अर्जापैकी आठ अर्ज बाद झाले तर १२१ स्वीकृत झाले. लासूर स्टेशन बाजार समितीतून दाखल १६३ अर्जांपैकी आठ अर्ज नामंजूर, तर १५५ मंजूर झाले.

छत्रपती संभाजी नगर बाजार समितीतील २२ गंगापूर बाजार समिती मधून तीन, तर कन्नड बाजार समिती मधून तीन, असे एकूण २८ अर्ज पुन्हा प्राप्त झाले होते.

बीड: जिल्ह्यातील नऊ बाजार विविध मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामध्ये पाटोदा बाजार समितीसाठी दाखल १६३ पैकी १९,वडवणी ९३ पैकी २, अंबाजोगाई १०६ पैकी १,कडा ५८ पैकी सर्व ५८ मंजूर , बीड १६६ पैकी ८, केज १६० पैकी १२,माजलगाव १७२ पैकी ५, गेवराई ६४ पैकी २, तर परळी बाजार समितीसाठी दाखल १२६ उमेदवारी अर्जापैकी ४ उमेदवारी अर्ज नामंजूर झाले होते.

जालना: जिल्ह्यातील एकूण ५ बाजार समितीसाठी निवडणूक होते आहे. त्यामध्ये अंबड बाजार समितीमधून प्राप्त १०२ पैकी ६, घनसावंगी १०६ पैकी ९, परतुर ६६ पैकी ३, आष्टी ८७ पैकी ३, मंठा १७७ पैकी ६ उमेदवारी अर्ज नामंजूर झाले आहेत. जिल्ह्यातील पाचही बाजार समित्यांसाठी दाखल ५३८ अर्जांपैकी तब्बल २७ अर्ज छाननीत बाद झाले आहेत.

Beed Apmc Election
Nanded Apmc Election Update : नांदेड बाजार समितीच्या निवडणुकीत २० अर्ज बाद

माजी प्रशासकाचा अर्ज फेटाळला..

छत्रपती संभाजीनगर बाजार समिती निवडणुकीत माजी प्रशासक जगन्नाथ काळे व माजी सभापती राधाकिसन पठाडे यांनी एकमेकांच्या अर्जाविरोधात आक्षेप घेतला होता.

या आक्षेपावर झालेल्या युक्तिवादानंतर बुधवारी (ता. ५) राखून ठेवलेला निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते यांनी गुरुवारी (ता. ६) जाहीर करताना श्री. काळे यांचा अर्ज फेटाळला, तर श्री. पठाडे यांचा अर्ज स्वीकृत केल्याची माहिती श्री बारहाते यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com