निकोबारच्या परिपक्व चालीरीती

मी नुकतेच राजेश्‍वरी किशोर यांचे ‘निकोबारची नवलाई’ हे पुस्तक वाचले. आज शिक्षणाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असले, तरी आजही आपल्या समाजात मुलांना त्यांचे निर्णय त्यांचे त्यांना घेऊ दिले जात नाही.
मशागत लेख
मशागत लेखAgrowon

मी नुकतेच राजेश्‍वरी किशोर यांचे ‘निकोबारची नवलाई’ हे पुस्तक वाचले. आज शिक्षणाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असले, तरी आजही आपल्या समाजात मुलांना त्यांचे निर्णय त्यांचे त्यांना घेऊ दिले जात नाही. शैक्षणिकदृष्ट्या कमी प्रगती असली तरी निकोबार बेटांवरील काही रिवाज खूप परिपक्व आहेत, असे वाटते. जसे लग्नाच्या बाबतीत आपल्याकडे अजूनही कित्येक घरात वडीलधाऱ्यांच्या संमतीशिवाय मुले लग्नाचा निर्णय घेऊ शकत नाहीत; पण या उलट निकोबारी मुलगा आणि मुलगी स्वतःचे लग्न स्वतः ठरवू शकतात.

मशागत लेख
Fertilizer Price Hike: खते महागल्यामुळे भात लागवड घटली?

लग्नानंतर त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे कोणत्याही घरी राहण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. खूप मोकळेपणाने आणि आनंदाने लग्नाचे विधी होतात. तिथे लग्नात भेट म्हणून मोठे पाळीव डुक्कर दिले जाते. आपण जसे पाळीव कुत्र्या-मांजराशी बोलतो तसे निकोबारी लोक डुकराशी बोलतात.

मशागत लेख
Soybean Sowing : अकोला जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी अव्वल

निकोबारच्या एका प्रथेचा तर आवर्जून उल्लेख करावासा वाटतो ती म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर केले जाणारे विधी. तिथे एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्या व्यक्तीचे सगळे कपडे, त्याच्या वस्तू, त्याचे किंवा तिचे दागिने त्या शवाबरोबरच पुरले जातात. किती छान आहे ना हे! म्हणजे गेलेल्या व्यक्ती नंतरच्या लोकांमध्ये संपत्तीसाठी, दागिन्यांसाठी नंतर भांडणे नकोत आणि ते मातीत पुरले जाणार तर त्याची हाव पण नको. पुस्तकी शिक्षण कमी असले किंवा नसले तरी आनंदी जगण्याचा व्यापक दृष्टिकोन आहे त्यांच्याकडे! निकोबारमध्ये दागिने म्हणजे समुद्रातून मिळालेले मोती, कोरल्स आणि इतर नैसर्गिक वस्तूंपासून बनवलेले असतात. अद्यापही बेटांवरील आदिवासी सोने वापरताना दिसत नाहीत.

आज देखील आधुनिक तंत्रज्ञान, विकास त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न सुरू आहे. पण त्यातले काही निकोबारी त्यांची जुनी संस्कृती, चालीरीती बाळगून आहेत. त्यांना स्वतःला बदलण्यापेक्षा, आहे त्यातच सुख वाटते आणि शक्य होईल तोपर्यंत ते त्याला चिकटून राहातात. माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे त्यांचे प्राचीन रिवाज ते अजूनही पाळताना दिसून येतात. आपण जसे मृत व्यक्तीचा फोटो ती व्यक्ती मृत झाल्यानंतर घरात लावतो तसे निकोबारी लोक त्या व्यक्तीच्या चणीचा लाकडी पुतळा बनवतात. त्या मृत व्यक्तीला ज्या ठिकाणी दफन केलं होतं तिथून त्याचा सांगाडा बाहेर काढून त्या लाकडी पुतळ्यावर ठेवला जातो. तो मुखवटा म्हणून वापरला जातो. त्याला नैसर्गिक रंगांनी रंगवले जाते. त्या पुतळ्यांमध्ये त्यांना आपले पूर्वज दिसतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com